‘उद्धव ठाकरेंची ती मोठी चूक होती’; सर्वोच्च न्यायालयाचं मोठं वक्तव्य

नवी दिल्ली | महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. यादरम्यान सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचं मत नोंदवलं आहे. सरन्यायाधिशांनी उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) राजीनाम्यावर भाष्य करत ती उद्धव ठाकरेंची मोठी चूक असल्याचं म्हटलं आहे.

सरन्यायाधिशांच्या वक्तव्यावर ठाकरे गटाचे वकिल अभिषेक मनु सिंघवी (Abhishek Manu singhavi) यांनी बोलताना जे झालं ते आम्ही बदलू शकत नाही, असं म्हटलं आहे.

उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला त्याच वेळी अधिकार गमावला. तुम्ही बहुमत चाचणीला सामोरे गेला असता आणि 39 आमदारांमुळे हरला असता तरीही आम्ही चाचणी रद्द केली असती, असं वक्तव्य सरन्यायाधीशांनी केलंय. 

अभिषेक मनु सिंघवी यांच्या युक्तिवादापूर्वी कपिल सिब्बल यांनी कोर्टात युक्तिवाद केला. यात अखेरच्या टप्प्यात त्यांनी निवडणूक आयोगाने अन्याय केल्याचा मुद्दा मांडला.

आमदारांच्या अपात्रतेबाबत कोर्टातल्या निर्णयाआधीच आयोगाने शिंदेंच्या बाजूने निर्णय दिल्याचं सिब्बल यांनी म्हटलं. केवळ आमदारांचं बहुमत गृहित धरून हा निर्णय दिला गेला. ज्यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार आहे, त्यांना गृहित धरून आयोग असा निर्णय़ कसा देऊ शकतो, असा सवाल सिब्बल यांनी केला.

महत्त्वाच्या बातम्या-