Post Office Senior Citizen Scheme | भारतीय पोस्ट ऑफिस नेहमीच आकर्षक व्याजदरासह नवीन-नवीन स्कीम आणत असतं. आता अशीच एक नवीन स्कीम पोस्ट ऑफिसने आणली आहे. या स्कीममध्ये (Post Office Senior Citizen Scheme) तुम्ही अगदी घरबसल्या बक्कळ कमाई करू शकता.
या पोस्ट ऑफिस योजनेत 8 टक्क्यांपेक्षा जास्त व्याज दर तर मिळणारच, यासोबतच दरमहा नियमित उत्पन्न देखील मिळेल. तसेच सरकार स्वतः गुंतवणुकीवर सुरक्षिततेची हमी देते. त्यामुळे ही योजना तुम्हाला मालदार बनण्याची मोठी संधी देणार आहे. प्रत्येक व्यक्ती कमाईचा एक भाग बचत म्हणून बाजूला ठेवत असतो. हा पैसा आपण चांगल्या ठिकाणी गुंतवत असतो. ज्या ठिकाणी आपल्याला यामुळे दुप्पट परतावा मिळेल, अशा ठिकाणी गुंतवणूक करण्याला आपण भर देतो.
पुढे हीच गुंतवणूक आपल्याला कठीण प्रसंगी कामी येते. अशा स्कीमसाठी पोस्ट ऑफिसच्या काही प्रचलित योजना आहेत. त्यापैकीच एक पोस्ट ऑफिस सीनियर सिटीझन सेव्हिंग स्कीम आहे, जी खासकरून ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे आणि याला गुंतवणुकीवर 8 टक्के वार्षिक व्याज मिळत आहे, म्हणजे बँक एफडीपेक्षा जास्त.
दरमहा 20,000 रुपये कमवा
पोस्ट ऑफिसमध्ये प्रत्येक वयोगटासाठी वेगवेगळ्या श्रेणींमध्ये लहान बचत योजना चालवल्या जात आहेत, ज्यामध्ये सरकार स्वतः सुरक्षित गुंतवणुकीची हमी देते. पोस्ट ऑफिस सिनियर सिटीझन सेव्हिंग्ज स्कीमबद्दल बोलायचे तर, ती सर्व बँकांमधील एफडीच्या तुलनेत अधिक व्याज देते. यासोबतच नियमित उत्पन्नाची हमी (Post Office Senior Citizen Scheme) देखील दिली जाते.
यामध्ये गुंतवणूक करून तुम्ही दरमहा 20,000 रुपये कमवू शकते. POSSC मध्ये उपलब्ध असलेल्या व्याजदराबद्दल सांगायचे तर, 1 जानेवारी 2024 पासून सरकार त्यात गुंतवणूक करणाऱ्यांना 8.2 टक्के दराने ऑफर करत आहे.
फक्त 1000 पासून गुंतवणूक करता येईल
या स्कीमसाठी तुम्ही फक्त 1000 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकता. या ज्येष्ठ नागरिक बचत योजनेतील गुंतवणूकीची कमाल मर्यादा 30 लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे. ही पोस्ट ऑफिस योजना निवृत्तीनंतर आर्थिकदृष्ट्या समृद्ध राहण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकते. यामध्ये 60 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाची कोणतीही व्यक्ती त्याच्या/तिच्या जोडीदारासह संयुक्त खाते उघडू शकते.
Post Office Senior Citizen Scheme योजनेत 5 वर्षांसाठी गुंतवणूक करावी लागते. तसेच कालावधीपूर्वी हे खाते बंद केल्यास, खातेधारकाला नियमानुसार दंड भरावा लागतो. याचे खाते तुम्ही जवळपासच्या कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन उघडू शकता. या योजनेंतर्गत काही प्रकरणांमध्ये वयातही सूट देण्यात आली आहे.
या पोस्ट ऑफिस योजनेत खातेदारांना कर लाभही मिळतो.आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत वार्षिक 1.5 लाख रुपयांपर्यंत कर सूट यात मिळते. या योजनेत दर तीन महिन्यांनी (Post Office Senior Citizen Scheme) व्याजाची रक्कम देण्याची तरतूद आहे. एप्रिल, जुलै, ऑक्टोबर आणि जानेवारी महिन्याच्या प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी व्याज आकारले जाते.
News Title- Post Office Senior Citizen Scheme
महत्त्वाच्या बातम्या –
शाहरुख खानने दिला जय श्रीरामचा नारा, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
पुण्यात नेमकं चाललंय तरी काय?; पोलिस उपनिरीक्षक असल्याचं सांगत केलं धक्कादायक कृत्य
मुलगा अनंत अंबानीचं हृदयस्पर्शी भाषण; ‘बापमाणूस’ मुकेश अंबानींना अश्रू अनावर!
“…तर अडचणी वाढणारच”, शतक झळकावताच शार्दुलने सांगितली BCCI ची मोठी चूक!
…म्हणून नरेंद्र मोदी हिंदू नाहीत; लालू यादव यांची पंतप्रधानांवर सडकून टीका