100 प्रभावशाली व्यक्तींची यादी जाहीर; या यादीत ‘इतक्या’ भारतीयांना मिळाले स्थान

100 most influential people l एका प्रसिद्ध मासिकाने 2024 या वर्षातील 100 प्रभावशाली व्यक्तींची यादी जाहीर केली आहे. या यादीत दोन भारतीय महिलांचा समावेश आहेत. ऑलिम्पिक पदक विजेती साक्षी मलिक आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांना या मासिकाच्या यादीत स्थान मिळाले आहे.

भारतीय वंशाच्या या व्यक्तिमत्त्वांना मिळाले स्थान :

कुस्तीमधील भारताची एकमेव महिला ऑलिम्पिक पदक विजेती साक्षी हिचा महिला कुस्तीपटूंच्या कथित लैंगिक छळाच्या विरोधात लढा दिल्याबद्दल भारतीय कुस्ती महासंघ (WFI) चे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांनी यादीत समाविष्ट केले आहे. अभिनेत्री आलिया भट्ट हिला अभिनय क्षेत्रात तसेच लोककल्याणाच्या कार्यात दिलेल्या योगदानासाठी या यादीत स्थान मिळाले आहे.

या यादीत भारतीय वंशाचा हॉलिवूड अभिनेता देव पटेल याचे देखील नाव आहे. देव पटेल हे इंडो-ब्रिटिश वंशाचे अभिनेते आहेत. मायक्रोसॉफ्टचे CEO सत्या नडेला हे देखील भारतीय वंशाचे आहेत आणि त्यांनाही या यादीत स्थान मिळाले आहे. यूएस विभागाच्या कर्ज कार्यक्रम कार्यालयाचे संचालक जिगर शाह यांचे देखील नाव या यादीत आहे.

100 most influential people l या यादीत प्रसिद्ध शेफ अस्मा खान यांना मिळाले स्थान :

उद्योगपती अजय बंगा यांनी देखील या 100 प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत स्थान मिळवले आहे. अजय बंगा हे जागतिक बँकेचे अध्यक्ष आहेत आणि त्यांचा जन्म पुणे, महाराष्ट्र येथे झाला आहे. या यादीत प्रसिद्ध शेफ अस्मा खान यांनाही स्थान मिळाले आहे. कोलकात्यात जन्मलेल्या अस्मा खान एक प्रसिद्ध शेफ असून लंडनच्या प्रसिद्ध रेस्टॉरंट दार्जिलिंग एक्स्प्रेसच्या मालकही आहेत.

येल विद्यापीठाच्या प्राध्यापिका प्रियमवदा नटराजन यांचाही या 100 प्रभावशाली व्यक्तिमत्त्वांमध्ये समावेश करण्यात आला आहे. तामिळनाडूतील कोईम्बतूर येथे जन्मलेल्या प्रियमवदा नटराजन या येल विद्यापीठातील खगोलशास्त्र आणि भौतिकशास्त्र विभागातील प्राध्यापक आहेत. कृष्णविवरांच्या अभ्यासासाठी ते जगभर ओळखले जातात.

News Title: 100 most influential people

महत्त्वाच्या बातम्या-

आज पंजाबचे शिलेदार मुंबई इंडियन्सला रोखणार का?

या राशीच्या व्यक्तींने आज प्रवास करणे टाळावा

पुण्यात मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी मनसेची फिल्डिंग; बैठकीत काय काय घडलं, जाणून घ्या संपूर्ण माहिती

राज ठाकरे आणि नरेंद्र मोदींबद्दल अमित ठाकरेंनी केला सर्वात मोठा खुलासा!

…तर तुतारी वाजवून टाका!; भाजप उमेदवार सुजय विखेंच्या आवाहनामुळे नगरमध्ये एकच खळबळ