अदानींसाठी मोठी गुड न्यूज; कंपनीला आले अच्छे दिन

मुंबई | हिंडनबर्गच्या अहवालानंतर अदानींना (Adani) मोठा झटका बसला होता. आता मात्र अदानी समूहासाठी मोठी गुड न्यूज समोर आली आहे. अदानींच्या समूहातील कंपन्यांच्या शेअर्सने (Share) उसळी घेतली आहे. यामुळे कंपनीला अच्छे दिन आल्याचं बोललं जात आहे.

24 जानेवारी 2023 रोजी अहवाल आला. त्यानंतर अदानी समूहात जोरदार पडझड सुरु झाली. अदानी समूहाने अनियमितता आणि शेअर्सचे बाजारातील मूल्य वाढवल्याचा आरोप हिंडनबर्ग रिपोर्टमध्ये करण्यात आला होता. त्यानंतर पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे त्यांचे शेअर्स कोसळले होते मात्र आता या शेअर्सने उसळी घेतली आहे.

अमेरिकेतील एका फर्मने अदानींवर विश्वास दाखवून शेअर्सची मोठ्या प्रमाणावर खरेदी केली आहे. परेदी गुंतवणूकदारांनी महिन्यापूर्वी अदानी समूहाकडे पाठ फिरवल्याचं पाहायला मिळालं होतं.

दरम्यान, श्रीमंतांच्या यादीतून देखील अदानी बाहेर फेकले गेले होते. मात्र आता पुन्हा त्यांनी शेअर बाजारात कमबॅक केलं आहे. दोन तासाच अदानींचं मार्केट कॅप वाढलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-