शिर्डी | राज्यात शिर्डीच्या साईबाबांवरून नवा वाद निर्माण झाला आहे. शिर्डीच्या साईबाबांना मुस्लिम ठरवण्याचा कट आखला जात असल्याचा आरोप कालीचरण महाराज (Kalicharan Maharaj) यांनी केला आहे. (A serious allegation of Kalicharan Maharaj)
शिर्डीचे साईबाबा हे महान संत होते. मात्र, त्यांना मुस्लिम घोषित करण्याचा प्रयत्न हा महामुर्खपणा असल्याचं कालीचरण महाराज यांनी म्हटलं आहे.
देशात लव्ह जिहाद सोबतच लँड जिहाद, बदनामी जिहाद, यूपीएससी जिहाद व लोकसंख्या जिहाद फोफावत असल्याचा आरोप कालीचरण महाराज यांनी यावेळी केला.
यवतमाळमध्ये हिंदू जनगर्जना सभेत कालीचरण महाराज यांनी हा आरोप केला. एवढंच नव्हे तर शिर्डीचं साई संस्थान आणि तमाम साईमंदिरांची संपत्ती हडप करण्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-