अंबानींच्या कार्यक्रमासाठी परदेशी कलाकारांनी घेतलं तब्बल ‘इतकं’ मानधन!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Anant Ambani Pre Wedding Fees | भारतातील प्रसिद्ध उद्योगपती अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग सोहळ्यात अनेक परदेशी कलाकारांनी हजेरी लावली. गेल्या आठवड्याभरापासून सोशल मीडियावर फक्त अंबानी यांच्या या कार्यक्रमाचीच (Anant Ambani Pre Wedding Fees)  चर्चा आहे.

सोशल मिडियावर सोहळ्याचे फोटो आणि व्हिडिओ याचीच चर्चा आहे. सोहळ्याची सजावट पासून ते पाहुण्यांचा पोशाख, दागिने, राहण्याची व्यवस्था इथपर्यंत सर्वच गोष्टींची चर्चा रंगली आहे. या सोहळ्यात पाण्यासारखा पैसा खर्च केल्याचं म्हटलं जातंय.

1 मार्च ते 3 मार्चपर्यंत चाललेल्या या प्री-वेडिंग सोहळ्यात अनेक दिग्गजांची उपस्थिती होती. या प्री-वेडिंग सोहळ्यात कॅरेबियन पॉप स्टार रिहाना हिने चांगलाच कल्ला केला. रिहानाच्या आधीही परदेशातील अनेक मोठ्या गायकांनी अंबानी कुटुंबाच्या कार्यक्रमांमध्ये परफॉर्म केलं आहे, यासाठी त्यांना कोटींचं मानधन देण्यात आलं.

Anant Ambani Pre Wedding Fees

रिहाना : कॅरेबियन पॉप स्टार रिहाना हिने एका परफॉर्मन्ससाठी 12 कोटी ते 99 कोटी रुपये घेते. मात्र, मीडिया रिपोर्ट्सनुसार रिहानाने अनंत आणि राधिकाच्या प्री-वेडिंगसाठी जवळपास 50 कोटी रुपयांहून (Anant Ambani Pre Wedding Fees) जास्त फी घेतली असल्याचं म्हटलं जातंय.

बियॉन्से : प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय गायिका बियॉन्स नोल्सने अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी आणि आनंद पिरामल यांच्या
एंगेजमेंटमध्ये परफॉर्म करण्यासतही तब्बल 33 कोटी रुपये घेतले होते. 2018 मध्ये राजस्थानच्या उदयपूरमध्ये ईशा आणि आनंदचा प्री-वेडिंग सोहळापार पडला होता.

ख्रिस मार्टिन : गायक ख्रिस मार्टिनने अंबानी कुटुंबाचा मोठा मुलगा आकाश अंबानी आणि श्लोका मेहता यांच्या लग्नात परफॉर्म केला होता. 2020 मध्ये झालेल्या या सोहळ्यात त्याने 8 कोटी रुपये घेतले होते.

अॅडम लेविन : आकाश अंबानी आणि श्लोका मेहता यांच्या लग्न सोहळ्यात प्रसिद्ध गायक ॲडम लेविनने देखील गाणे गायले होते.त्याने या कार्यक्रमासाठी तब्बल 8 ते 12 कोटी रुपये घेतल्याचं म्हटलं जातं.

News Title-  Anant Ambani Pre Wedding Fees

महत्वाच्या बातम्या-

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला आठवली ‘देशभक्ती’, खेळाडूंना दिला गंभीर इशारा!

Facebook आणि Instagram डाऊन अन् मार्क झुकरबर्गचं मोठं नुकसान!

मुंबईकरांसाठी खुशखबर! CNG च्या दरात मोठी कपात, सामान्यांना दिलासा

7 भारतीयांची फसवणूक! रशिया फिरायला गेलेल्या तरूणांना युक्रेनविरूद्धच्या युद्धात उतरवले

850 विकेट घेणारा भारतीय क्रिकेटपटू निवृत्त; तरूणाईला संधी मिळावी म्हणून निर्णय