“मनोज जरांगे-पाटील सन 2019 पासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत”

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Manoj Jarange Patil |  सरकार ओबीसी प्रवर्गातून आरक्षण न देता स्वतंत्र आरक्षण देत आहे. मात्र, जरांगे (Manoj Jarange Patil ) यांना ते मान्य नसल्याने त्यांनी पुन्हा सरकारविरोधात जाण्याचा निर्णय घेतला आहे. यासोबतच त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

तुम्हाला बळी घ्यायचा असेल तर माझा बळी घ्या. मी सागर बंगल्यावर येतो. तुमच्या पायाशी मी आंदोलन करतो. देवेंद्र फडणवीस यांना मला मारायचं आहे. त्यांचा सलाईनमध्ये विष घालून मारण्याचा प्लान आहे.असे आरोप जरांगे पाटील यांनी केली आहेत. यावरून राजकीय वातावरण तापले असतानाच जरांगे पाटील यांच्यावरच त्यांचे एकेकाळचे सहकारी बाबूराव वाळेकर यांनी पत्रकार परिषद घेत आरोप केले आहेत.

“मनोज जरांगे शरद पवारांचा माणूस”

मनोज जरांगे (Manoj Jarange Patil ) सन 2019 पासून राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये आहेत. ते प्रसिद्धीसाठी भुकेले आहेत. त्यांनी आतापर्यंत राष्ट्रवादीच्या एकाही नेत्यावर आरोप केले नाही. 2019 मध्ये राजेश टोपे त्यांना भेटले होते. आताही यांची गुप्त भेट झाली आहे. त्यामुळे जरांगे यांच्या आमिषाला बळी पडू नका. असा आरोप बाबूराव वाळेकर यांनी केला आहे.

इतकंच नाही तर पुढे ते म्हणाले की, जरांगेंनी आत्तापर्यंत खुप लोकांचे संसार उद्ध्वस्त केले आहेत. आम्ही तुरुंगात गेलो आणि प्रसिद्धी यांनी मिळवली. आम्ही तुरुंगात होतो पण आम्हाला काहीही मिळालं नाही. माझ्याकडे बरेच पुरावे आहेत, वेळ आली तर मी तेदेखील उघड करेन. असा इशारा देखील वाळेकर यांनी दिला आहे.

“..तेव्हा जरांगेंनी तिथून पळ काढला”

बाबूराव वाळेकर यांनी कोपर्डी घटनेचा उल्लेख करत मोठा खुलासा केला. ही घटना घडली तेव्हा जरांगे यांनी एक बैठक घेतली होती. आरोपीवर हल्ला करायचा असं त्यांनी सांगितलं. या बैठकीमध्ये आम्ही 10 ते 12 लोक होतो. यासाठी मढी या ठिकाणी एका रेस्ट हाऊसवर आम्ही सर्व होतो.आरोपी अहमदनगर कोर्टात आला. आम्ही चौघे चार दिशांना होतो, मनोज जरांगे एका बाजूला उभे होते. आम्ही चौघांनी आरोपीवर हल्ला केला त्यावेळी जरांगेंनी (Manoj Jarange Patil ) तिथून पळ काढल, असा आरोप वाळेकर यांनी केला आहे. या आरोपांमुळे जरांगे पाटील आता चर्चेत आले आहेत.

दरम्यान, मुंबईला निघालेले मनोज जरांगे यांनी परत आपल्या गावी परतण्याचं आवाहन मराठा बांधवांना केलं आहे. अंबडमध्ये संचारबंदी लावण्यात आल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी मागे फिरण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती मिळत आहे.

News Title –  Baburao Walekar alleges against Manoj Jarange Patil

महत्वाच्या बातम्या-

“सागर बंगल्याबाहेरील मोठी भिंत पार करा…”; नितेश राणेंचं जरांगेंना आव्हान

सदावर्तेंनी शरद पवारांचं नाव घेत केली ‘ही’ मोठी मागणी

‘खुमखुमी असेल तर फडणवीस यांनी…’; जरांगे भडकले

आदित्य ठाकरेंकडून एकनाथ शिंदेंना चॅलेंज, म्हणाले…

मनोज जरांगे पाटील सागर बंगल्याकडे रवाना!