Maratha Reservation | ‘…तर मी आमदारकीचा राजीनामा देईन’; ‘या’ आमदाराची मोठी घोषणा

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Maratha Reservation | मराठा आरक्षणाला (Maratha Reservation) मी जाहीर पाठिंबा देतो. मराठा आरक्षणासाठी वेळ आली तर मी आमदारकीचा राजीनामाही देईन, अशी घोषणाच राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी केली आहे.

आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते बाबूराव पोटभरे यांनी मराठा आरक्षण अधिकार परिषदेचे आयोजन केलं होतं. यावेळी आमदार प्रकाश सोळंके प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या परिषदेत बोलताना प्रकाश सोळंके यांनी मोठी घोषणा केली आहे.

सरकार समोर पेच आहे, कायद्यात टिकणारं आरक्षण द्यायचं आहे. त्यासाठी त्रुटी दूर करून मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे, असं सोळंके म्हणालेत.

35 लाख कुणबी नोंदी सापडल्या आहेत. 60 वर्षात कोणत्याही सरकारने या नोंदी का तपासल्या नाहीत. अन्यथा आधीच आरक्षण मिळाले असते, असं सांगतानाच मराठ्यांना लोकसंख्येनुसार आरक्षण मिळालं पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केलीये.

मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं, तसेच समाजाची नोंद कुणबी म्हणून करावी ही मनोज जरांगे पाटील यांची मागणी रास्त आहे. त्यांच्या आंदोलनामुळेच कुणबी प्रमाणपत्र मिळण्याचा रस्ता खुला झाला आहे, असं सोळंके म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या- 

Uddhav Thackeray | शिवसेनेच्या गोटातून मोठी बातमी समोर; ठाकरेंना पुन्हा धक्का

Weather Update | सुट्टीत फिरायचा प्लॅन करताय?, हवामान विभागाने दिला महत्त्वाचा सल्ला

Investment | मुलांच्या भविष्याचं असं करा प्लॅनिंग, वयाच्या विशीतच होईल करोडपती!

Hampi | अत्यंत कमीत कमी बजेटमध्ये हम्पीला कसे फिरुन यायचे?

Gautam Gambhir | प्रसिद्ध क्रिकेटपटूच्या अडचणी वाढल्या, ‘या’ कारणामुळे होणार मोठी कारवाई?