Investment | मुलांच्या भविष्याचं असं करा प्लॅनिंग, वयाच्या विशीतच होईल करोडपती!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Investment | पालक आपल्या मुलांच्या चांगल्या भविष्यासाठी ते लहान असल्यापासूनच मेहनत घेत असतात. मुलांना चांगले भविष्य द्यायचे असेल तर त्याची सोय आतापासूनच करावी लागेल. कारण मुलांच्या शिक्षणासाठी आता अफाट पैसा खर्च होतो.

मुलाच्या चांगल्या भविष्यासाठी आर्थिक नियोजन खूप महत्तवाचं आहे. त्यामुळे आज अशा योजनेबद्दल सांगणार आहे ज्यामुळे तुमची मुले 21 व्या वर्षी 2 कोटी रुपयांचे मालक होतील.

Investment | 21 वर्षात दोन कोटी रूपये जमतील

तुम्ही ही गुंतवणूक (Investment)  योजना मुलाच्या जन्मापासून सुरू करू शकता. 21 वर्षात तुम्हाला इतका परतावा मिळेल की मुलाकडे 2.1 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम असेल.

दरमहा 10,000 रुपये गुंतवा

तुमच्या मुलाकडे वयाच्या 21 व्या वर्षी 2 कोटींपेक्षा जास्त रक्कम असावी असं तुम्हाला वाटत असेल, तर तुम्हाला दरमहा 10,000 रुपये SIP मध्ये गुंतवावे (Investment) लागतील. याद्वारे तुम्ही 21 वर्षात मुलाच्या नावावर 25.20 लाख रुपये जमा करू शकाल. आता आपण असं गृहीत धरू की SIP वर तुम्हाला 16 टक्के परतावा मिळेल. त्यानंतर 21 वर्षे पूर्ण झाल्यानंतर तुमच्याकडे 2.06 कोटी रुपये असतील.

मुलाच्या नावावर 25.20 लाख रुपये जमा केल्यास 21 वर्षांत तुम्हाला 1.81 कोटी रुपये मिळतील. मुलाचं वय 21 वर्षे झाल्यानंतर, ही रक्कम मुलाचं शिक्षण, लग्न किंवा व्यवसायात गुंतवणुकीसाठी वापरली जाऊ शकते. ICICI प्रुडेन्शियल मल्टी अॅसेट फंडाने 21% पर्यंत परतावा दिला आहे.

आपण असं समजू की गृहीत धरू की आपल्याला 16% व्याज मिळालं नाही आणि SIP मध्ये फक्त 12% व्याज मिळालं. तरीही तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीचा पश्चात्ताप करावा लागणार नाही. अशा परिस्थितीत तुमच्या मुलाला 25.20 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर 88.66 लाख रुपयांचा परतावा मिळेल. त्याच्याकडे एकूण 1.13 कोटी रुपये असतील.

महत्त्वाच्या बातम्या- 

Hampi | अत्यंत कमीत कमी बजेटमध्ये हम्पीला कसे फिरुन यायचे?

Gautam Gambhir | प्रसिद्ध क्रिकेटपटूच्या अडचणी वाढल्या, ‘या’ कारणामुळे होणार मोठी कारवाई?

INDvSA | दक्षिण आफ्रिका-भारत मालिकेपूर्वी मोठा झटका, ‘हा’ स्टार खेळाडू संघाबाहेर

Fennel Seeds | जेवणानंतर बडीशेफ खाल्ल्याने नेमके काय फायदे होतात?, जाणून थक्क व्हाल

Sharad Pawar | मोठी बातमी! ‘या’ नेत्याने सोडली शरद पवारांची साथ