अमृता फडणवीसांच्या चाहत्यांसाठी मोठी खुशखबर!

मुंबई | अमृता फडणवीसांचं(Amruta Fadnvis) नुकतंच ‘आज मैने मूड बना लिया'(Aaj Maine Mood Bana liya) हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या गाण्याला चाहत्यांनी चांगलीच पसंती दिली आहे. हे गाणं अल्पावधीतच 50 मिलीयनपेक्षा जास्त लोकांनी युट्यूबवर पाहिलं आहे.

परंतु अमृता यांनी या गाण्यावर रियाज अलीसोबत रील बनवल्यानं त्या वादाच्या भोवऱ्यात अडकल्या होत्या. त्यामुळं त्यांना ट्रोलही करण्यात आलं होतं.

परंतु अमृता यांनी प्रजासत्ताक दिनानिमीत्त प्रेक्षकांना मोठं सरप्राईज दिलं आहे. कारण गुरूवारी अमृताजींनी त्यांच्या एका नवीन गाण्याचा ट्रेलर शेअर केला. विषेश म्हणजे हे गाणं एका बिगबजेट चित्रपटातील आहे.

अमृता यानी ट्रेलर शेअर केलेल्या गाण्याचं नाव ‘सारे जहाॅंसे अच्छा हिंदोस्ता हमारा’ असं आहे. हे गाणं आगामी ‘भारतीयन्स’ या बहुभाषिक चित्रपटातील आहे.

अमृता यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून या गाण्याच्या ट्रेलरसोबतच गाण्याची पूर्ण लिंकही शेअर केली आहे. त्यांच्या या नवीन गाण्यालाही प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.

महत्वाच्या बातम्या-