“आंबेडकरांचे विचार मोदी-फडणवीस समोर नेत आहेत”
मुंबई | वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनी(Prakash Ambedkar) शरद पवारांबाबत(Sharad Pawar) केलेल्या वक्तव्यामुळं वाद निर्माण झाला आहे. या वादावर स्पष्टीकरण देण्यासाठी प्रकाश आंबेडकरांनी पत्रकार परिषद घेतली होती.
पत्रकार परिषदेतत आंबेडकर म्हणाले आहेत की, भाजप(BJP) आणि आरएसएस मनुस्मृतीला मानतो. जर भाजपनं घटनेच्या चौकटीतून काम करायला सुरू केली तर आम्ही भाजपसोबतही जाऊ.
आता आंबेडकरांच्या या वक्तव्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे(Chandrashekhar Bawankule) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बावनकुळे म्हणाले की, प्रकाश आंबेडकर लहान डोक्याचे आहेत. भाजप हा जगातील सर्वात मोठा पक्ष आहे. भाजपचे सर्वात जास्त काम अधिवासी क्षेत्रात आहे.
डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) शासन करत आहेत. डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार मोदी-फडणवीस समोर नेत आहेत, असंही बावनकुळे म्हणाले आहेत.
काॅंग्रेस पक्षानं स्वत:च्या स्वार्थासाठी अनेकदा संविधान तोडले. परंतु मोदींनी आंबेडकरांच्या संविधानातील कोणत्याही कलमात दुरूस्ती केली नाही.
हे सगळं आंबेडकरांना कळायला हवं. जर व्यक्तिगत विरोधी म्हणून तुम्ही राजकारणासाठी अशी टीका करत असाल तर हे दुर्दैवी आहे, असंही त्यांनी प्रकाश आंबेडकरांना सुनावलं.
महत्वाच्या बातम्या-
- ‘त्यात काय लपवण्यासारखं आहे’, आर्चीनं केला बाॅयफ्रेंडबद्दल खुलासा
- ‘…तर आम्ही भाजपसोबत जाऊ’, प्रकाश आंबेडकरांच्या वक्तव्यानं राजकीय वर्तुळात खळबळ
- शाहरूखच्या पठाण चित्रपटानं दोन दिवसांत केली तब्बल ‘इतक्या’ रूपयांची कमाई
- ऐन थंडीत ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा इशारा
- खासदार ओमराजे निंबाळकरांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट!
Comments are closed.