खासदार ओमराजे निंबाळकरांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट!

उस्मानाबाद | ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर (Mp Omraje Nimbalkar) यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. शिंदेंच्या बंडाबाबत पूर्वीपासून माहित होतं, असं वक्तव्य ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) यांनी केलं आहे.

ते शिक्षक मतदार संघाचे उमेदवार विक्रम काळे यांच्या प्रचारासाठी आयोजित शिक्षक मेळाव्यात बोलत होते. यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं.

शिवसेनेमध्ये होणाऱ्या बंडाची कुणकुण आम्हाला पूर्वीपासून होती, हालचाली दिसत होत्या, असा दावा ओमराजे निंबाळकर यांनी केला आहे. 

सत्ता गेली तरी संघर्ष करायचा असं आमचं आणि कैलास पाटील यांचं ठरलं होतं. बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेमुळं पद मिळालं सन्मान मिळाला, असं ओमराजे निंबाळकर यांनी म्हटलं आहे. 

दरम्यान, राज्यातील सत्तांतरावेळी कैलास पाटील हे शिंदे गटासोबत होते. मात्र ओमराजे निंबाळकर यांच्या फोनमुळेच कैलास पाटील हे गुजरात बॉर्डरवरून परत आले, असं वक्तव्य विक्रम काळे यांनी केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-