राष्ट्रवादी-वंचितमध्ये वादाची पहिली ठिणगी!

मुंबई | राजकारणात (In politics) अनुभवाला फार महत्त्व आहे असं म्हणलं जातं. राजकारणातल्या लहानसहान बाबी यावेळी उपयोगाच्या ठरतात. कोणत्या वेळी कोणता निर्णय आपल्या पक्षाला फायदा करुन देईल याची अचूक जाणीव त्या अनुभवी व्यक्तीला असते. अनेकदा काही निर्णय फसतात देखील. थोडक्यात काय तर राजकारण करण्यासाठी महाभारतातल्या शकुनी मामा सारखं डोक असणं गरजेचं आहे असं म्हणलं जातं. राजकारणाच्या सारीपाटावर या गोष्टी अनेकदा महत्त्वाच्या ठरतात. आता इतकं सगळं सांगण्याचं प्रयोजन म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या असंच काही घडताना दिसतंय. कारण राजकारणात मातब्बर असणारे आणि अनुभवी म्हणून ओळखले जाणारे नेते म्हणजे शरद पवार. याच शरद पवारांवर काही आरोप करण्यात आलं आहेत. आजही महाविकास आघाडी सरकारमध्ये असूनदेखील शरद पवार यांचा भाजपला छुपा पाठिंबा असल्याचा आरोप केलाय. हे असं का? आणि खरंच असं काही आहे का?

शिंदेच्या बंडानंतर हल्ली सगळ्यानांच राजकारणात कधी काय होईल याची धास्ती लागून राहिली आहे. अचानक झालेला सत्ताबदल हा नागरिकांसाठी आश्चर्यकारक होता. हे 2019 मध्ये देखील पहायला मिळालं आणि 2022 ला तर अनेकांना धक्काच बसला. सध्या 2024 च्या निवडणुकीपर्यंत (Election) काय काय होईल हे सांगणं अवघड होऊन बसलं आहे.

तर मुद्दा हा की शिंदेंच्या बंडानंतर ठाकरेगट आपला पक्षमजबूत करण्याचा प्रयत्न करत आहेत. अनेकदिवसांपासून वंचित बहुजन आघाडी आणि ठाकरेंच्या शिवसेनेची युती होणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. मात्र या आघाडीला राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचा पाठिंबा नव्हता. ही युती त्यांना मान्य नव्हती. मात्र अखेर चर्चेनंतर 23 जानेवारीला दिवगंत नेते बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिवशी शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीच्या (Vanchit Bahujan Alliance) युतीची घोषणा करण्यात आली. मात्र अजूनदेखील या आघाडीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या म्हणावा तसा पाठिंबा नाही आहे. असं दिसतयं.

याचं कारण पहायला गेल्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) याच्यातील वाद सर्वश्रुत आहेच. अशातच यावेळी बोलताना आंबेडकर म्हणाले शरद पवार आजदेखील भाजपबरोबर आहे. यावेळी आंबेडकरांनी 2019 च्या वेळी झालेल्या गोष्टीची आठवण करुन दिली. ते म्हणाले अजित पवार (Ajit Pawar) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा सकाळचा शपथविधी झाला होता. त्यानंतर अजित पवारांनी जी मुलाखत दिली त्यात त्यांनी म्हणलं होत की लोक फक्त मलाच का दोष देत आहेत, समजत नाही. हे आमच्या पक्षाचं ठरलं होतं. मी फक्त पहिला गेलो. 2019 च्या लोकसभेपूर्वीच हे ठरलं होतं. म्हणजेच 2019 ला जे झालं त्यामध्ये शरद पवार यांचाच हात होता, असा आरोप आंबेडकरांनी केला आहे.

दुसऱ्या बाजूने पहायला गेल्यास या गोष्टीत थोड्या प्रमाणात तथ्यदेखील आहे. 2019 च्या सत्ताबदलावेळी अजित पवारांना शरद पवारांनीच (Sharad Pawar) हा सल्ला दिला होता. त्यानंतर पुन्हा यु-टर्न घेण्यात आला. तसेच आजदेखील भाजपचे नेेते शरद पवारांचे गोडवे गात असताना दिसतंय. मध्यंतरीदेखील फडणवीस आणि शरद पवारांनी गाडीतून केलेला प्रवासदेखील चर्चेचा विषय ठरला होता. त्यामुळे एका बाजूने पाहिल्यास आंबेडकरांनी केलेल्या विधान बरोबर आहे का? असा प्रश्न पडला तरी त्यात काही गैर नाही.

दरम्यान, सध्या शिवसेनेच्या आणि वचिंतआघाडीबाबत शरद पवारांनी आपल्याला काही माहित नसल्याचं सांगितलं आहे. त्यांना ही युती मान्य नसल्यास पुन्हा कोणता नवीन फासा शरद पवार टाकतील हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More