शिंदे-फडणवीसांच्या अडचणीत वाढ?

मुंबई | शिंदेंनी बंडखोरी करत भाजपसोबत सरकार स्थापन केलं. शिंदेंच्या बंडापासून महाविकास आघाडी विरूद्ध शिंदे गट आणि भाजप असा वाद पाहायला मिळतोय. शिंदे-फडणवीस सरकार लवकरच कोसळेल, अशा आशायाची वक्तव्ये महाविकास आघाडीकडून होत असतानाच राजभवानातू एक अत्यंत महत्वाची माहिती समोर आली आहे. ही माहिती शिंदे-फडणवीस सरकारसाठी(Shinde-Fadnvis Goverment) मोठी अडचण ठरू शकते आणि त्यामुळं सरकारही कोसळू शकतं. आता या माहितीत नेमके काय महत्वाचे मुद्दे आहेत आणि हे मुद्दे शिंदे-फडणवीस सरकारला कशी अडचण ठरू शकताता हेच आपण आता जाणून घेऊयात.

2019 मध्ये विधानसभा निवडणूका भाजप-शिवसेनेने युती करत लढवल्या पण या निवडणूका पार पडल्यानंतर मात्र शिवसेना-भाजपमधील मतभेद उफाळून आले आणि ऐनवेळी शिवसेना-भाजप युती तुटली. मग उद्धव ठाकरेंनी काॅंग्रेस-राष्ट्रवादीला सोबत घेऊन महाविकास आघाडी सरकार स्थापन केलं. परंतु जेव्हापासून महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं तेव्हापासून भाजप नेते खासकरून देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnvis) हे सरकार अडीच वर्षात कोसळेल असं वक्तव्य वारंवार करत होते आणि खरंच अगदी तसंच झालं आणि अडीच वर्षात महाविकास आघाडी सरकार कोसळलं.

आता शिंदेंचं बंड आमदार-खासदारांच्या संख्याबळावर यशस्वी ठरलं. शिंदेंनी भाजपसोबत हातमिळवणी करत सरकार स्थापन केल्यानंतर हे सरकार अवैध आहे, असं म्हणत ठाकरेंनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. परंतु अजून या प्रकरणाचा अंतिम निकाल समोर आला नाही.

आता पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. कारण एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथच असंविधानिक आहे, अशी माहिती समोर आली आहे. घटनेनुसार सरकार स्थापन करण्यासाठी राजभवनाकडून शिंदे आणि फडणवीस यांना सरकार स्थापन करण्याचे पत्र यायला हवं होतं. परंतु एकनाथ शिंदेंना आणि देवेंद्र फडणवीसांना त्यावेळी सरकार स्थापनेसाठी कोणतेही निमंत्रण अथवा अधिकाराचे पत्र राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी दिलेलं नव्हतं, अशी माहिती माहिती आता समोर आलीय. त्या संदर्भात राष्ट्रवादीचे नेते महेश तपासे यांनी ट्विटही केलं आहे.

विधीमंडळानं अशा प्रकारचे सरकार कसं स्थापन करून घेतलं?, याला सांविधानिक अस्तित्व काय?, याचा खुलासा राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी करावा, अशी मागणीही आता महेश तापसे यांनी केली आहे. त्यामुळं आता शिंदे-फडणवीस सरकार अडचणीत येण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या-

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More