Shraddha Walkar Case| हत्येच्या ‘त्या’ रात्री नेमकं काय घडलं?

नवी दिल्ली | श्रद्धा वालकर(Shraddha Walkar) प्रकरणानं सगळ्या देशाला हादरवून टाकलं आहे. दिवसेंदिवस नवनवीन खुलासे समोर येत आहेत. याच प्रकरणी एक नवी माहिती समोर आली आहे. यामध्ये श्रद्धाच्या हत्येच्या रात्री नेमकं काय घडलं हे समोर आलं आहे.

श्रद्धाची आणि आफताबची ओळख बंबल (Bumble) या डेटिंग अ‌ॅपवर झाली होती. ते दोघे एकत्र आल्यानंतर देखील श्रद्धाच्या फोनमध्ये ते अ‌ॅप होतं. त्यावरुनच श्रद्धाची एका नवीन मुलासोबत ओळख झाली होती. 17 तारखेला श्रद्धा त्या मुलाला भेटण्यासाठी गुरुग्रामला गेली होती.

दुसऱ्या दिवशी 18 तारखेला आफताब श्रद्धाची वाट बघत होता. त्यादिवशी 18 तारखेला सकाळी 11 च्या सुमारास श्रद्धा घरी आली. त्यानंतर रात्रभर कुठे होतीस?, असा प्रश्न आफताबनं तिला विचारला. यावर उत्तर देत श्रद्धा म्हणाली, मी कुठेही जाईन तुला काय करायचं आहे. त्यावरुन दोघांमध्ये मोठा वाद झाला.

त्यादिवशी आफताबनं श्रद्धाला मारहाण केली. थोड्या वेळाने वातावरण निवळल्यानंतर दोघांसाठी जेवणदेखील ऑर्डर केल्याचं चार्टशीटमध्ये(Chart sheet) सांगितलं आहे. पुन्हा त्या संध्याकाळी श्रद्धा घरी आली नाही याच कारणानं आफताब पुन्हा चिडला. त्यानं रागाच्या भरात श्रद्धाचा गळा दाबला.

दरम्यान, आफताब पुनावाला (Aftab Punawala) यांच्यावर त्याची लिव-इन पार्टनर श्रद्धा वालकर हिचा खून केल्याचा आरोप आहे. हत्या करुन तिच्या शरीराचे 35 तुकडे करण्यात आले. त्यानंतर हे तुकडे वेगवेगळ्या ठिकाणी फेकून देत हत्या केल्याचे पुरावे मिटवले होते. सहा महिन्यानंतर हे प्रकरण बाहेर आलं, त्यानंतर आफताबला अटक करण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More