सतर्क! ‘या’ जिल्ह्यांत थंडीची लाट येण्याची शक्यता

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | जानेवारी महिन्याचा पंधरवडा उलटला तरीही अजून काही ठिकाणी थंडीचा(Winter) जोर कायम आहे. त्यातच आता हवामान खात्याकडून थंडीबाबत महत्वाची अपडेट समोर आली आहे.

पुढच्या आठवड्यात राज्यात थंडीची लाट येण्याचा अंदाज हवामान खात्यानं(Department Of Meteorology) वर्तविला आहे. या थंडीचा परिणाम रब्बी हंगामाच्या पिकांवर होण्याची शक्यता आहे, त्यामुळं बळीराजा चिंतेत आहे.

पुढच्या आठवड्यात मध्य महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढणार आहे, असा अंदाजही वर्तविण्यात आला आहे. तसेच मुंबईतील किमान तापमान सरासरीपेक्षा कमी होऊ शकते, असाही अंदाज आहे.

29 जानेवारी नंतर राज्यात थंडीचा जोर वाढून थंडीची लाट आल्यासारखी परिस्थीती निर्माण होऊ शकते. ही थंडीची लाट २ फेब्रुवारी पर्यंत राहील, असा हवामान खात्याचा अंदाज आहे.

दरम्यान, वाढत्या थंडीच्या जोरामुळं पिकांवर परिणाम होऊ शकतो. काही भागांत कांदा पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढला असल्याचे दिसून येत आहे. याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसू शकतो.

या वातावरणाचा गहू, मका, हरभरा या पिकांवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. परिणामी उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या-