मोठी बातमी! राज ठाकरेंविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी
मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरेंविरोधात (Raj Thackeray) अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आलं आहे. आज राज ठाकरे परळी न्यायालयात हजर राहणार असल्याची माहिती समोर येत आहे.
2008 साली ऑक्टोंबर महिन्यात राज ठाकरेंना मुंबईत अटक (Arrest) करण्यात आली होती. त्याचे पडसाद राज्यभर उमटले होते. ठिकठिकाणी तोडफोडीचे प्रकारही घडले. परळीतील धर्मापुरी पॉईंटवर एसटीवर दगडफेक करण्यात आली. यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं.
या घटनेनंतर जमावबंदी आदेशाचे उल्लंघन, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान आणि चिथावणीखोर वक्तव्य प्रकरणी राज ठाकरे यांच्यासह मनसेच्या अनेक कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले होते.
दरम्यान, या पूर्वी 3 जानेवारी आणि नंतर 12 जानेवारीला राज ठाकरेंना परळी न्यायालयात हजर राहण्यास सांगितले होते. अचानक काही कारणामुळे दौरा रद्द झाला होता. मात्र राज ठाकरे परळीत येणार असल्याने मनसे कार्यकर्त्यांनी स्वागताची तयारी केली आहे.
12 तारखेला राष्ट्रमाता जिजाऊ जयंती होती, त्यामुळे न्यायालयाने तारीख वाढवून दिली आहे. त्यानुसार आता त्यांना असून येणाऱ्या 18 जानेवारीला त्यांना हजर राहण्यास सांगण्यात आलं होतं.
महत्त्वाच्या बातम्या-
Comments are closed.