सत्यजित तांबेंबाबत अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट, म्हणाले…

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | नाशिक (Nashik Mlc) विधान परिषद पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेसमध्ये गोंधळ पाहण्यास मिळाला आहे. सत्यजीत तांबे (Satyajit Tambe) यांनी अपक्ष अर्ज भरल्यामुळे गोंधळ वाढला आहे. या प्रकरणावर आता राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अजित पवारांनी या मुद्दावर पत्रकार परिषद घेऊन नाराजी व्यक्त केली. काँग्रेस पक्षाने अधिकृत उमेदवारी देऊन त्यांनी फॉर्म न भरल्याने हे झालं. आम्ही उमेदवारी दिली होती. प्रश्न नागपूर आणि अमरावतीचा राहिला होता, असं ते म्हणाले.

मला कुणकुण लागली होती मी काँग्रेस वरिष्ठ फोन करून सांगितलं होतं, काळजी घ्या आणि डमी फॉर्म भरून घ्या, असा सल्ला दिला होता, असा खुलासाही अजित पवारांनी केला.

विधान परिषद निवडणूक सुरू आहे. नाशिक पदवीधर मध्ये प्रश्न निर्माण झाला आहे. आमची चर्चा सुरू आहे, असं अजित पवारांनी सांगितलंय.

काही अडचणीमुळे काँग्रेस नेते आले नाही. जागा कुणाला द्यायचं हे आधीपासून ठरले होते, असंही अजितदादा म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या-