राज्यात मध्यावधी निवडणूका लागणार?; उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य

मुंबई | उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राज्यांमध्ये मध्यावधी निवडणुका लागण्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या याच वक्तव्यावर संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया देत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणताय म्हणजे काहीतरी तथ्य असेल असंही म्हंटलं आहे.

दरम्यान, पुण्यातील पोटनिवडणुकीच्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे ऑनलाइन पद्धतीने उपस्थित झाले होते. त्यावेळी बोलत असतांना उद्धव ठाकरे यांनी ही शक्यता वर्तवली होती.

राज्याच्या राजकारणात मध्यावधी निवडणुका लागण्याची शक्यता आहे का ? असा प्रश्न राजकारणातील जेष्ठ नेते असलेल्या शरद पवार यांनाही विचारण्यात आला होता. त्यावर शरद पवार यांनी भाष्य केलं आहे.

उद्धव ठाकरेंनी कशाच्या आधारे हे वक्तव्य केलं हे मी जाणून घेतलेलं नाही. पण मध्यावधी निवडणुका आत्ता लागतील असं मला वाटत नाही, असं म्हणत एकूणच उद्धव ठाकरे यांची शक्यता शरद पवार यांनी फेटाळून लावली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-