येत्या दोन दिवसात राज्यात पुन्हा राजकीय भूकंप होणार? 

मुंबई | शिंदे गटातील आमदारांच्या अपात्रतेबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. आमदारांनी व्हीप मोडल्यामुळे त्यांना अपात्र ठरवण्यात यावं अशी मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे. अशात यावर मंत्री उदय सामंत यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

राज्यात मध्यावधी निवडणुका लागण्याची काहीही शक्यता नाही. आमच्याकडे 170 आमदारांचं बहुमत आहे. शिवाय 15 ते 20 आमदार आमच्या संपर्कात आहेत, असं वक्तव्य उदय सामंत यांनी केलं आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा राजकीय भूकंप होणार का? या चर्चांना उधाण आलं आहे.

अजून 15 ते 20 लोक आमच्या संपर्कात आहेत. येत्या एक-दोन दिवसात आपल्याला याची प्रचिती येईल. त्यामुळे मध्यावधी निवडणुका लागण्याची काहीही शक्यता नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, कसब्यात काँग्रेस आणि चिंचवडमध्ये राष्ट्रवादी यांना आपल्याला विजयी करावंच लागेल. पण माझा अंदाज आहे की विधानसभेची मध्यावधी निवडणूक लागेल किंवा लागू शकेल, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते.

महत्त्वाच्या बातम्या-