चिंचवड पोटनिवडणुकीमध्ये मोठा ट्वीस्ट!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीला नाट्यमय वळण मिळालं आहे. आज मोरया गोसावीचं दर्शन घेऊन अश्विनी जगताप (Aswini Jagtap) यांनी प्रचाराला सुरुवात केली आणि अर्ज ही भरला आहे. तर दुसरीकडे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप (Mla Laxman Jagtap) यांचे बंधू शंकर जगताप यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे.

शंकर जगताप सुद्धा उमेदवारीसाठी इच्छुक होते. पण, त्यांच्या ऐवजी अश्विनी जगताप यांना तिकीट देण्यात आलं आहे.

अचानक शंकर जगताप यांनी अर्ज भरल्यामुळे कार्यकर्ते गोंधळात पडले. पण लक्ष्मण जगताप यांचा हा डमी अर्ज असल्याचा खुलासा भाजपच्या नेत्यांकडून करण्यात आला आहे.

आमदार लक्ष्मण जगताप उमेदवारी अर्ज भरत असतानादेखील मी खबरदारी म्हणून अर्ज भरत होतो. अर्जाच्या छाननीच्या वेळी अनेक अर्ज नाकारले जाऊ शकतात. त्यामुळे लक्ष्मण जगताप असा डमी अर्ज भरुन ठेवायचे, असं शंकर जगताप यांनी सांगितलंय.

आजदेखील मी खबरदारी म्हणूनच डमी अर्ज भरून ठेवला आहे. ऐन वेळी अनेक तांत्रिक अडचणी निर्माण होतात. त्यावेळी कोणतीही गफलत होऊ नये, यासाठी मी आज अर्ज भरला आहे, असं ते म्हणालेत.

महत्त्वाच्या बातम्या-