सावधान! नाॅनव्हेज जेवण आवडतं?, तुम्हालाही होऊ शकतो ‘हा’ गंभीर आजार

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

नवी दिल्ली| डायबेटीजचं प्रमाण हल्ली दिवसेंदिवस वाढत आहे. शरीरातील रक्तातील साखरेची पातळी असामान्यपणे वाढते. एखाद्या व्यक्तीचे शरीर पुरेसे इंसुलिन (Insulin) हार्मोन्स तयार करु न शकल्याने डायबेटीज होतो.

डायबेटीजचे(Diabetes) काही प्रकार आहेत. एक टाईप 1 चा डायबेटीज. टाईप 1 हा डायबेटीज कोणत्याही वयात होऊ शकतो. मुख्यता तरुणांमध्ये दिसून येतो. अनेकदा हा जन्मापासून देखील झालेला असू शकतो. यामध्ये शरीरातील पेशी इंसुलिन तयार करणाऱ्या स्वादुपिंडावर हल्ला करुन नाश पावतात.

टाईप 2 चा डायबेटीज. हा डायबेटीजचा दुसरा प्रकार आहे. हा होण्याची अनेक कारणं असू शकतात. लठ्ठपणा,उच्च रक्तदाब आणि बदलेली जीवनशैली यामुळे हा डायबेटीज होतो. हा मुख्यत्वे करुन प्रौढांमध्ये जास्त पहायला मिळतो.

अशावेळी मांसाहार केल्याने अधिक त्रास होण्याची शक्यता असते. यात असणाऱ्या सॅच्युरेटेड फॅटमुळे (Saturated fat) ह्द्याचे गंभीर आजार होण्याची शक्यता असते. तसेच मांसातील सोडियम नायट्रेटमुळे (Sodium nitrate) इंसुलिनचा प्रतिकार होतो. यामुळे टाइप 2 चा डायबेटीज होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे डायबेटीज असलेल्या लोकांनी शक्य तितका कमी मासांहार करावा.

या प्रकारच्या डायबेटीज मध्ये अनेक प्रकारची पथ्ये पाळावी लागतात. गोड पदार्थाचे सेवन कमी करावे लागते. फुल क्रिम आणि जास्त चरबीयुक्त(fat) पदार्थंना वर्ज्य करावं लागतं. तळलेले आणि प्रक्रिया केलेले पदार्थे खाण्यास मनाई केली जाते.

रसयुक्त फळे जसं की संत्री, सफरचंद या पदार्थाचें सेवन योग्य ठरते. बोक्रोली, फ्लाॅवर, काकडी यांसारख्या भाज्याचा आहारात समावेश असावा. डाळी, नट, बदाम तसेच प्रथिनयुक्त(Protein rich) पदार्थ देखील तुमच्या डाएटमध्ये असणं गरजेचं आहे.

महत्त्वाच्या बातम्या