“मुख्यमंत्र्यांचं भाषण गल्लीतलं होतं, हे सरकार टीकणारच नाही”

मुंबई | मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनात केलेल्या भाषणावरून विरोधक एकनाथ शिंदेंची(Eknath Shinde) चांगलीच कोंडी करत असल्याचे दिसत आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार(Ajit Pawar) मुख्यमंत्र्यांच्या भाषणावर बोलताना म्हणाले होते की, शिंदेंनी केलेले भाषण पूर्णपणे राजकीय होतं.

त्याचत आता शिवसेना खासदार संजय राऊतांनीही(Sanjay Raut) मुख्यमंत्र्यांच्या अधिवेशनातील भाषणावर जोरदार टीका केली आहे. सध्याचं सरकार बेकायदेशीर आहे. हे सरकार टीकणार नाही, असा दावाही राऊतांनी केला आहे.

अधिवेशनातलं मुख्यमंत्र्यांचं भाषण गल्लीतलं होतं. त्यांनी आपण कुठं काय बोलयाचं याचं भान राखलं पाहीजे, असं म्हणत राऊतांनी शिंदेंच्या भाषणावर जोरदार टीका केली आहे.

मुख्यमंत्र्यांना संधी मिळाली आहे परंतु ती बेकायदेशीरपणे. त्यांना संधी मिळाली आहे परंतु त्यांनी काम संयमानं केलं पाहीजे. निधानसभेतील भाषणात त्यांनी विकासावर बोलायला पाहीजे होतं, असंही राऊत यावेळी म्हणाले.

विकासावर बोलायचं गरजेचं असताना त्यांनी वैयक्तिक मुद्द्यांवर भाषण केलं मग विकासावर कोण बोलणार, असा प्रशन्ही राऊतांनी यावेळी उपस्थित केला.

तसेच दीपक केसकरांना प्रत्युत्तर देताना राऊत म्हणाले की, आत्मपरिक्षण कोणी करायचं ज्याचं त्यानं ठरवावं. गद्दारांनी आम्हाला आत्मपरिक्षणबद्दल काही सांगू नये. आम्हाला आत्मपरिक्षणाची गरज नाही. खर तर त्यांनाच आत्मपरिक्षणाची गरज आहे.

महत्वाच्या बातम्या-

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More