गोवरबद्दल केंद्राची धक्कादायक माहिती, ‘हे’ 12 जिल्हे धोकादायक घोषित

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | 2 वर्षांपूर्वी कोरोनाने भारतात शिरकाव केला. महाराष्ट्रात देखील कोरोनाचा प्रचंड उद्रेक पाहायला मिळाला. शाळांपासून उद्योगांपर्यंत सगळंच काही ठप्प तर झालंच मात्र सगळ्याच्या मनात भितीचं वातावरण होतं. आजही प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे त्यांचे परिणाम आपल्याला दिसत आहेत. मात्र आता पुन्हा एकदा एक चिंता वाढवणारा संसर्गजन्य असा गोवरचा प्रभाव महाराष्ट्रात प्रचंड वाढतोय. लहान मुलांचा जीव हा छोटासा संसर्गज्य रोग घेतोय. याचबाबतीत एक महत्वाची माहिती समोर आली आहे.

महाराष्ट्रातील गोवर रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे. याच पाश्वर्भूमीवर शुक्रवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयामार्फत राज्याच्या आरोग्य विभागाला पत्र पाठवून महाराष्ट्रात मुंबई, ठाण्यासह 12 जिल्हे धोकादायक असल्याची माहिती दिली आहे. आणि त्यामुळे आरोग्य यंत्रणा कामाला लागल्याचं पहायला मिळत आहे.

केंद्राकडून पाठवण्यात आलेल्या यादीत कोणत्या राज्यात किती प्रमाणात कमी लसीकरण झाल आहे. याची यादी देण्यात आली आहे. या यादीमध्ये अती धोकादायक, धोकादायक, मध्यम धोकादायक आणि कमी धोकदायक अशी वर्गवारी करण्यात आली आहे.

तसेच यादीत देण्यात आलेल्या 12 जिल्ह्यामध्ये लसीकरणाचं प्रमाण कमी असून केंद्राने त्या जिल्ह्यांकडे लक्ष देण्यास सांगितलं आहे. त्या जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा आहे का एकदा चेक करा. ते जिल्हे आहेत औरंगाबाद, धुळे, जळगाव, जालना, कोल्हापूर, मुंबई, मुंबई उपनगर, नांदेड, नाशिक, परभणी, पुणे, ठाणे हे ते जिल्हे आहेत. तुमच्या आजूबाजूला जर असे काही रुग्ण लहान मुले तुम्हाला दिसली तर काळजी करु नका. हायपर होऊ नका. सपोर्टिव्ह ट्रीटमेंट, हायड्रेशन, व्हिटॅमिन ए, पॅरासिटामॉल अशाने हा आजार बरा होतो. तसेच लसीकरण देखील करु शकता.

गोवर म्हणजे काय? थोडक्यात जाणून घेऊयात

गोवर ज्याला गोवरी, माता, खसरा, मिजल्स, ओरी अशा विविध नावाने ओळखल्या जाणाऱ्या विषाणूमुळे होणारा हा आजार आहे. हा अत्यंत संसर्गजन्य असा आजार आहे. हा आजार हवेतून रॉफ्लेट इन्फेक्शन म्हणून पसरतो. हा आजार साधारणपणे सहा महिने ते पाच वर्ष वयोगटातील मुलांना जास्त प्रमाणात होतो. 

आता हे आजार अचानक वाढण्याचं कारण काय कोविड-19  महामारीच्या काळात सर्वत्र कोरोनामुळे भीतीचं वातावरण होतं. रुग्णालयात जाऊन लस घेणं हे धोक्याचं वाटत असल्याने काही बालकांचा गोवर लसीचा पहिला डोस चूकला तर काहींचा दुसरा. त्यामुळे फक्त भारतातचं नाही तर जगभरात पुन्हा एकदा गोवरची साथ येण्याची भीती जागतिक आरोग्य संघटनेकडून व्यक्त केलीये.

त्यामुळे वरील दिलेल्या जिल्ह्यात जर तुमचा जिल्हा असेल तर काळजी घ्या. आणि हा व्हिडीओ जितक्या लोकांना शेअर करता येईल तितका करा. काय माहित त्यांना हा उपयोगी पडू शकतो.

महत्त्वाच्या बातम्या-