आत्ताच करुन घ्या बँकेची सर्व कामं, कारण पुढच्या महिन्यात…

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | अनेकांची आता बँकेत अनेक काम निघतात. नवीन खातं सुरु करायचं असेल किंवा खातं अपडेट करायचं असेल तर बँकेत जावं लागतं पण हा डिसेंबर बँकेच्या कर्मच्याऱ्यांसाठी पुन्हा एकदा दिवाळी घेऊन आलाय. कारण येत्या डिसेंबर महिन्यात बँक अनेक दिवसांसाठी बंद राहणार आहेत.

त्यामुळे पुढच्या महिन्यात बँकेत जाऊन काही महत्त्वाची कामे मार्गी लावण्याचा विचार करत असाल तर आधी सुट्ट्यांची यादी नीट ऐका. कारण असं होऊ नये की ज्या दिवशी तुम्ही बँकेत जाल त्या दिवशी ती बंद असेल आणि तुम्हाला रिकाम्या हाताने परतावं लागेल.

डिसेंबर महिन्यात चार रविवार आहेत, ज्या दिवशी बँकेला साप्ताहिक सुट्टी असेल, तर दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारीही आपल्याकडे बँका बंद बसतात. याशिवाय काही सण आणि विशेष दिवसांमुळे बँकांमध्ये कामकाज होणार नाही.

रिझर्व्ह बँकच्या कॅलेडरमध्ये डिसेंबर महिन्याच्या हाॅलिडेमध्ये वेगवेगळ्या राज्यात आणि शहरांमध्ये 3, 12, 19, 24, 26, 29, 30, 31 डिसेंबर रोजी बँक सुट्टी जाहीर केलीय.

या रिझव्‍‌र्ह बँकेने सुट्ट्यांची जी यादी जाहीर केली आहे, त्यातील अनेक सुट्ट्या राष्ट्रीय आहेत. तर काही सुट्ट्या स्थानिक किंवा प्रादेशिक स्तराच्या असतात. त्यामुळे तर महाराष्ट्रातील बँकेला सुट्टी असेल तर त्यामेळी मणिपूर मधील बॅक बंद राहील अशी गरज नाही.

थोडक्यात बातम्या- थोडक्यात बातम्या-