उरलेले आमदारही फुटणार?, उद्धव ठाकरेंचं टेंशन वाढलं

मुंबई | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर आधी सूरतमार्गे शिंदे गटाचे सगळे आमदार गुवाहाटीला (Guwahati) गेले.

एकनाथ शिंदेंनी सर्व आमदारांसह गुवाहाटील कामाख्या देवीचं दर्शन घेतलं. त्यानंतर गोवा मार्गे सगळे आमदार विधीमंडळात दाखल झाले आणि शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आलं.

सत्तेत आल्यानंतर आता पुन्हा एकदा एकनाथ शिंदे मंत्री आणि आमदारांसह गुवाहाटीला कामाख्या देवीच्या दर्शनासाठी जात आहेत. शिंदेंचं कुटुंबही यावेळी त्यांच्यासोबत आहे. यावर ठाकरेगटाच्या वतीने टीका करण्यात आली आहे. अशात शिंदे गटातील बड्या नेत्याने मोठा दावा केलाय.

उदय सामंत यांनी गुवाहाटीला रवाना होण्यापूर्वी विमानतळावर माध्यमांशी बोलताना मोठा दावा केला आहे. यामुळे उद्धव ठाकरेंचं टेंशन वाढण्याची शक्यता आहे.

चर्चा काहीही असो, आम्ही सगळे एकसंघ आहोत. येताना कदाचित आमच्यासोबत जास्त लोक असतील”, असं उदय सामंत म्हणाले आहेत. त्यामुळे ठाकरे गटातून अजून काही लोक शिंदे गटात जाण्याची चर्चा सुरू झाली आहे.

मला वाटतं मध्यावधी निवडणुका लागण्याचा प्रश्नच येत नाही. काही लोकांना भीती वाटते की आपल्याकडचे लोक इकडे-तिकडे जातील की काय! त्यामुळे त्यांचं मनोधैर्य वाढवण्यासाठी हे सगळं चाललंय, असं ते म्हणालेत.

थोडक्यात बातम्या-

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More