“…म्हणून अमृता फडणवीस 100 वर्षे म्हाताऱ्या होणार नाहीत”

मुंबई | मला असं वाटतं अमृता फडणवीस 100 वर्ष म्हाताऱ्या होणार नाहीत. कारण त्या खूप हिशोबत अन्न ग्रहण करतात. खुश राहतात, असं वक्तव्य योगगुरू रामदेव बाबांनी केलंय.

रामदेव बाबा ठाण्यातील योगा कार्यक्रमामध्ये बोलत होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यावेळी उपस्थित होते. यावेळी बोलत असताना रामदेव बाबांनी महिलांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

रामदेव बाबांनी केलेल्या वक्तव्यावरून आता प्रचंड टीका होत आहे. सोशल मीडियावर त्यांचा व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय.

महिलांनी साडी नेसली तरी छान दिसतात. सलवार कमीज घातलं तरी छान दिसतात. माझ्या मते तर काही नाही घातलं तरी छानच दिसतात, असं रामदेव बाबांनी म्हटलंय.

रामदेव बाबांनी केलेल्या वक्तव्यावरून आता प्रचंड टीका होत आहे. सोशल मीडियावर त्यांचा व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय.

महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे विराट व्यक्तिमत्त्व आहे, तर एकनाथ शिंदे यांच्यासारखे ऊर्जावान व्यक्ती आहे, शिंदे-फडणवीस एकात्म भावनेने नवनिर्माण करत आहेत. या दोघांनी मिळून इतिहास रचला आहे, रचणार आहेत, असंही ते यावेळी म्हणालेत.

महत्त्वाच्या बातम्या-