‘राजकारण म्हणजे मिमिक्री नाही’; संजय राऊतांचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर

मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मनसेच्या गटाध्यक्षांच्या मेळाव्यात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर टीका केली होती. त्याचवेळी राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्या आजारपणावरून त्यांची मिमिक्रीही केली होती. राज यांच्या या टीकेचा संजय राऊत यांनी अत्यंत खोचक शब्दात समाचार घेतला आहे.

जे आमच्यावर टीका करत आहेत. त्यांनी बुलढाण्याची सभा पाहायला हवी होती. उद्धव ठाकरे यांचं भाषण ऐकायला हवं होतं. अख्खा बुलढाणा त्या दिवशी रस्त्यावर उतरला होता. उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी हे महाराष्ट्राने पाहिलंय, असंही ते म्हणाले.

राज ठाकरे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावरही टीका केली होती. त्याचाही राऊत यांनी समाचार घेतला. त्यांनी राज यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने गेल्या तीन महिन्यात ज्या पद्धतीने मेहनत आणि कष्ट घेतले आहेत. ते त्यांच्यावर टीका करणाऱ्यांनी चार दिवस घेऊन दाखवावेत, असं आव्हानच त्यांनी राज ठाकरे यांना दिलं.

उद्धव ठाकरेंवर टीका करून किंवा अन्य कुणावर टीका करून तुमचं राजकारण किती काळ चालणार?, असा संजय राऊतांनी राज ठाकरेंना केला आहे.

मी एका पक्षाचं नाव घेत नाही. काही विधायक कामे करा. संघटनात्मक कामे करा. जे आम्ही करत आहोत. आमच्या पक्षावर एवढी संकटं आहेत. तरीही आम्ही काम करत आहोत, लढत आहोत, असं त्यांनी सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या-