‘तुमच्या पक्षाचं नाव बदलून…’; सुषमा अंधारेंची राज ठाकरेंवर टीका

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | गोरेगाव येथील मनसे गटनेत्यांच्या मेळाव्याला राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी संबोधित केलं. यावेळी बोलताना ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. यावर सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी राज ठाकरेंनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे.

महाराष्ट्रातले प्रकल्प गुजरातला गेल्याबद्दल मला वाईट वाटत नाही. इतर राज्यही संघराज्य पद्धतीतील आहे, त्यांचाही विकास झाला पाहिजे, अशी भूमिका राज ठाकरे यांनी मांडली. असं असेल तर तुमच्या पक्षाचं नाव महाराष्ट्र नवनिर्माण सेने ऐवजी संघराज्य नवनिर्माण सेना करा ना, असा टोला सुषमा अंधारेंनी लगावला आहे.

वडापावची गाडी हटवा, टॅक्सीवाल्यांचं आंदोलन करायचं, यापेक्षा गुज्जू बिल्डरांनी जे अतिक्रमण केलं, यावर राज ठाकरे चकार शब्द बोलत नाहीत. त्यामुळे ते 360डिग्री फिरत आहेत, असंच वाटतंय.

टोलचं आंदोलन केलं. जो माणूस 25 लाखाची गाडी वापरू शकतो, तो 50रुपयांचा टोल भरूच शकतो. त्यामुळे टोलनाक्यांचं आंदोलन करण्यापेक्षा रस्ते नीट आहेत का, हे आंदोलन बघा, असा कानमंत्र सुषमा अंधारेंनी दिलाय.

राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या अख्य्या भाषणाचा गोषवारा काढला तर एकाच वाक्यात सांगता येईल की बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात, असंही त्या म्हणालेत.

राज ठाकरेंनी आजवर केलेली आंदोलनं निरर्थक असल्याने ते 360 डिग्रीत फिरत आहेत. अशी टीका शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केलीये.

महत्त्वाच्या बातम्या-