दोन वर्षांपूर्वी जसं सांगितलं, अगदी तसंच आफताबनं श्रद्धाला संपवलं!

नवी दिल्ली | संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या श्रद्धा वालकर (Shraddha Walkar) प्रकरणाचं गूढ अजूनही कायम आहे. दिवसेंदिवस या हत्याकांड प्रकरणाशी संबंधित नवनवे खुलासे समोर येत आहेत. आता या प्रकरणी नवीन माहिती समोर आली आहे.

23 नोव्हेंबर 2020 रोजी आफताबने जे सांगितलं तेच केलं. दोन वर्षांपूर्वी पालघर जिल्ह्यातील तुळींज पोलीस ठाण्यात 23 नोव्हेंबर 2020 ही तारीख होती. तेव्हा श्रद्धाने स्वत:च्या हाताने तक्रार लिहून पोलीस ठाण्यात दिली होती.

दोन वर्षांपूर्वी 23 नोव्हेंबर 2020 रोजी श्रध्दाने लिहिलेलं पत्र किंवा त्याऐवजी पोलीस तक्रार समोर आली आहे. जर आपण तारीख आणि वर्ष विसरलो आणि ही तक्रार नुसती वाचली तर असं दिसतं की श्रद्धाने हे पत्र तिच्या हत्येनंतर लिहिलं आहे, जे तिने दोन वर्षांपूर्वी लिहिलं होतं, दीड वर्षांनंतर तिच्यासोबतही तेच घडलं.

श्रद्धाने तक्रार करूनही पोलिसांनी काहीच कारवाई का केली नाही? असा सवाल यानंतर उपस्थित झाला आहे. यावर आता तुळींज पोलिसांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

आफताब आपल्याला ठार मारून तुकडे तुकडे करण्याची भीती तिने 2020 मध्ये व्यक्त केली होती. याप्रकरणी पोलीस उपायुक्त सुहास बावचे यांनी सांगितलं, की या पत्रानंतर श्रद्धाने तिची तक्रार मागे घेतली होती. यामुळे या प्रकरणात पुढे काही कारवाई झाली नसल्याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे.

श्रद्धा वालकर प्रकरण नेमकं काय?

आफताब पुनावाला याच्यावर त्याची लिव-इन पार्टनर श्रद्धा वालकर हिचा खून केल्याचा आरोप आहे. श्रद्धा वालकर हिची गळा दाबून हत्या केल्यानंतर आफताब याने तिच्या शरीराचे तब्बल 35 तुकडे केले होते. त्यानेतर हेच तुकडे त्याने वेगवेगळ्या ठिकाणी फेकून देत हत्या केल्याचे पुरावे मिटवले होते. मे महिन्यात झालेल्या या हत्याकांड प्रकरणानंतर थेट सहा महिन्यांनी म्हणजेच नोव्हेंबर महिन्यात आफताब याला अटक करण्यात आलीये.

महत्त्वाच्या बातम्या-