जेवण करायचं असेल तर ‘या’ वेळेतच करा, नाहीतर… चाणक्याचं ऐकाल तर फायद्यात राहाल!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Chanakya Niti | बदलत्या जीवनशैलीनुसार मानवाच्या अनेक सवयीदेखील बदलल्या आहेत. त्यात जेवणाच्या सवयीदेखील बदलत जातात. आजकाल पौष्टिक नाही तर फास्ट फूड खाण्याला अधिक भर दिला जातो. त्यातच जेवणाची योग्य वेळ देखील नसते.

मात्र, कधीही जेवण करणं अत्यंत घातक असतं. याचा जीवनावर गंभीर परिणाम होत असतो.आचार्य चाणक्य यांनीही याबाबत अगोदरच सांगून ठेवलंय. त्यामुळे भोजन करण्याची योग्य वेळ कोणती, याबाबत या लेखात सविस्तर माहिती दिली आहे.

अति जास्त आहार घातक

आचार्य चाणक्य (Chanakya Niti) यांच्या मते, पोट खराब झाल्याने अनेक गंभीर आजार होतात. ज्याचा थेट परिणाम मानवी वयावर होतो. जेव्हा व्यक्ती तेलकट अन्न सेवन करते तेव्हा ते पचायला जड जाते आणि अपचनाची शिकार होते ज्यामुळे व्यक्तीसाठी खूप गंभीर समस्या उद्भवू शकते.

चाणक्य नीतीमध्ये म्हटलं आहे की, जर तुम्हाला अपचन वाटत असेल, पोट भरल्यासारखे वाटत असेल किंवा खाल्ल्याने तुम्हाला त्रास होऊ शकतो असे वाटत असेल तर तुम्ही काही काळ खाणे सोडून द्यावे. अन्यथा, तुम्हाला आणखी अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

पौष्टिक आहार घेणे

यासोबतच गरजेपेक्षा जास्त अन्न खाणे हे विष मानलं गेलं आहे. गरजेपेक्षा जास्त खाल्ल्याने पोटाचे त्रास सुरू होतात. तुम्हाला यामुळे अनेक आजरांचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे जेवढी आपली भूक आहे तेवढाच आहार घ्यायला हवा.

जेवणाची योग्य वेळ निश्चित करावी

त्यातच आपल्या आहारामध्ये पौष्टिक (Chanakya Niti) अन्नाचा समावेश असावा. पौष्टिक अन्न म्हणजेच पालेभाज्या, प्रथिनेयुक्त, लोहयुक्त आहार. यासोबतच फळे असा आहार करण्यावर भर द्यायला हवा. अन्यथा तुमच्या आरोग्यावर परिणाम होतात. त्यामुळे तुम्ही लवकर आजारी पडतात. म्हणून जेवणाची योग्य वेळ निश्चित करावी, कधीही जेवू नये.

News Title : Chanakya niti for healthy life

महत्वाच्या बातम्या-

श्रेयंका पाटील आरसीबीसाठी ठरली गेम चेंजर; मुंबईच्या पराभवामागे हे ठरले मोठे कारण

शिंदे गटाचा नेता मुख्यमंत्री होणार?, बॅनरबाजीने चर्चांना उधाण

शरद पवार आणि महादेव जानकर यांची भेट?; महादेव जानकरांचा अखेर खुलासा

सर्वसामान्यांना मोठा झटका! 800 पेक्षा अधिक औषधे महागणार

दिलासादायक बातमी! पुढील 10 दिवस गॅस सिलेंडर मिळणार मोफत