आता सर आणि मॅडम यांना सुद्धा गणवेश, महाराष्ट्र शासनानं घेतला मोठा निर्णय

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Dress Code | महाराष्ट्र शासनाने राज्यातील शालेय शिक्षकांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. राज्यभरातील प्रत्येक शाळेत शिक्षकांसाठी ड्रेसकोड लागू करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना जसा शाळेत गणवेश असतो तसाच आता शिक्षकांसाठी देखील ड्रेसकोड लागू होणार आहे.

त्यामुळे शाळेत ठरवून दिलेलेच कपडे शिक्षकांना परिधान (Dress Code)करावे लागणार आहेत. यासोबतच शिक्षकांच्या नावाअगोदर  इंग्रजीत ‘टीआर’ आणि मराठीत ‘टि’ संबोधन लावण्याची सूचनाही देण्यात आली आहे. शालेय शिक्षण विभागाने या संदर्भातील शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे.

शिक्षक हा समाजातील महत्वाचा घटक असतो. शिक्षकाचा संबंध विद्यार्थी, पालक, प्रतिष्ठित व्यक्ती, लोकप्रतिनिधी यांच्याशी येत असतो. त्यामुळे अध्यापनाचे काम करताना आपला पेहराव शाळेला आणि पदाला अनुरूप ठरेल, याची सर्वतोपरी काळजी घेणे अभिप्रेत आहे. असं म्हणत शिक्षकांच्या पेहरावासंदर्भातील मार्गदर्शक सूचना शालेय शिक्षण विभागाने दिल्या.

‘असा’ असणार ड्रेसकोड

महिला शिक्षकांसाठी साडी, चुडीदार-सलवार, कुर्ता, दुपट्टा अशा पद्धतीने ड्रेसकोड (Dress Code) असू शकतो. तर पुरुष शिक्षकांसाठी शर्ट, ट्राउझर पँट, शर्ट इन करून पेहराव असावा, अशा सूचना करण्यात आल्या आहेत.

यासोबतच पेहरावाला शोभतील अशी पादत्राणे (चप्पल) असावीत, वैद्यकीय कारण असल्यास पुरुष, महिला शिक्षकांना बूट घालण्यातून सवलत द्यावी, स्काऊट गाईडच्या शिक्षकांना स्काऊट गाईडचाच पेहराव असेल, असं सुचनेत म्हटलं आहे.

शिक्षकांच्या पेहरावाचा रंग कुठला असावा याबाबत शाळेने निर्णय घ्यावा असं शासनाने सांगितलं आहे. यासोबतच शिक्षकांच्या नावाच्या आधी इंग्रजीत टीआर (Tr)आणि मराठीत टि असे संबोधन लावण्याची परवानगीही देण्यात आली आहे.

News Title- Dress Code For Teachers In Schools In Maharashtra

महत्त्वाच्या बातम्या –

शिंदे गटाचा नेता मुख्यमंत्री होणार?, बॅनरबाजीने चर्चांना उधाण

शरद पवार आणि महादेव जानकर यांची भेट?; महादेव जानकरांचा अखेर खुलासा

सर्वसामान्यांना मोठा झटका! 800 पेक्षा अधिक औषधे महागणार

दिलासादायक बातमी! पुढील 10 दिवस गॅस सिलेंडर मिळणार मोफत

मुंबईकरांनो पाणी जपून वापरा; पुढील ‘इतके’ दिवस पाणीकपात होणार