अमिताभ बच्चन यांच्या प्रकृतीबद्दल मोठी अपडेट समोर; व्हिडिओ पाहून चाहते झाले हैराण

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Amitabh Bachchan | बॉलिवूडचे महानायक अर्थातच अमिताभ बच्चन यांची प्रकृती बिघडली असून त्यांना तातडीने मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली होती. या बातमीमुळे चाहत्यांमध्ये चिंतेचं वातावरण दिसून आलं.

इतकंच नाही तर, अमिताभ यांच्यावर अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात आली असं देखील म्हटलं गेलं. आता अशातच अमिताभ बच्चन यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामुळे चाहते हैराण झाले आहेत.

अमिताभ यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली?

अमिताभ बच्चन यांनी काल एक ट्वीट केलं होतं. यामध्ये त्यांनी लिहिलं,”मी तुमचा सदैव आभारी आहे.” अँजिओप्लास्टीनंतर बिग बींनी हितचिंतकांचे आभार व्यक्त केले आहेत, असा अंदाज हे ट्वीट पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी लावला होता. अँजिओप्लास्टी झाल्यानंतर अमिताभ बच्चन यांना सुट्टी देण्यात आल्याचं देखील म्हटलं गेलं.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

मात्र, ही बातमी फेक असल्याची माहिती स्वतः अमिताभ (Amitabh Bachchan) यांनी दिली आहे. याबाबत त्यांचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये बिग बी मुलगा अभिषेक बच्चन आणि सचिन तेंडुलकर यांच्यासोबत क्रिकेट खेळाचा आनंद घेताना दिसत आहेत.

अमिताभ बच्चन यांचा व्हिडिओ व्हायरल

‘आईएसपीएल टी 10’ सामन्या दरम्यानचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. याचवेळी अमिताभ बच्चन यांनी चाहत्यांना त्यांच्या प्रकृतीची माहिती दिली. अमिताभ बच्चन यांना चाहते आणि पापाराझी यांना घेरलं. तेव्हा बिग बी यांनी तेथे उपस्थित असलेल्या पत्रकारांना प्रकृतीबद्दल सांगितलं. सुरुवातील ते हैराण झाले आणि नंतर ‘फेक न्यूज’ असल्याचं त्यांनी सांगितलं.

त्यामुळे चाहत्यांना दिलासा मिळाला आहे. अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, सध्या ते त्यांच्या कल्की 2898 AD या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. या चित्रपटात प्रभास, कमल हासन, दीपिका पदुकोन आणि दिशा पटानी मुख्य भूमिकेत आहेत.

News Title- Amitabh Bachchan health update

महत्त्वाच्या बातम्या –

शिंदे गटाचा नेता मुख्यमंत्री होणार?, बॅनरबाजीने चर्चांना उधाण

शरद पवार आणि महादेव जानकर यांची भेट?; महादेव जानकरांचा अखेर खुलासा

सर्वसामान्यांना मोठा झटका! 800 पेक्षा अधिक औषधे महागणार

दिलासादायक बातमी! पुढील 10 दिवस गॅस सिलेंडर मिळणार मोफत

मुंबईकरांनो पाणी जपून वापरा; पुढील ‘इतके’ दिवस पाणीकपात होणार