लोकसभा निवडणुकीआधी सुनेत्रा पवार यांची पोस्ट चर्चेत

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Sunetra Pawar | आगामी लोकसभा निवडणुकांसाठी सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. महाराष्ट्रात जागा वाटपावरून सध्या महायुतीमध्ये तसंच मविआमध्ये अनेक बैठका, चर्चासत्र होत आहेत. त्यात बारामती लोकसभा मतदारसंघातली निवडणूक यंदा अधिक चर्चेत आली आहे.

या ठिकाणी राष्ट्रवादीच्या नेत्या आणि शरद पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे या निवडणुकीला उभ्या राहणार आहेत. तर दुसऱ्या बाजूला त्यांच्या विरोधात महायुतीचा उमेदवार म्हणून सुनेत्रा पवार उभ्या राहणार आहेत. या ठिकाणी शरद पवार विरुद्ध अजित पवार असा सामना होणार आहे.

त्यामुळे बारामतीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. अशात सुनेत्रा पवारांची एक फेसबुक पोस्ट चर्चेत आली आहे. त्यांनी बारामतीमध्ये गजर घड्याळाचाच, अशी पोस्ट केली आहे. त्यामुळे सध्या सुनेत्रा पवार यांचीच चर्चा होत आहे.

सुनेत्रा पवार यांची पोस्ट

माळेगावमधून बाहेर पडल्यानंतर साईनगर येथे रस्त्याच्या कडेला बरेच लोक उभे होते.आधी काहीच कल्पना नव्हती. मात्र तरीही हे लोक बहुदा आपल्यालाच भेटण्यासाठी थांबले असतील अशी शक्यता वाटली आणि गाडी थांबवली. भटके जोशी समाज संघटनेचे ते पदाधिकारी, कार्यकर्ते होते. या समाज बांधवांना मी माळेगावात आल्याचे समजल्याने ते मलाच भेटायला गावात येत होते. मात्र वाटेतच भेट झाली.

ही सर्व मंडळी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडून आजपर्यंत कशी मदत झाली ते अगदी भरभरून आनंदी चेहऱ्याने सांगत होते. कोरोना काळात तर दादांनी फक्त त्यांनाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील त्यांच्या अनेक समाज बांधवांना भक्कम आधार दिल्याचे सांगितले.ते बोलत असताना मी गाडीतून उतरू लागले तर म्हटले, ‘नका त्रास घेऊ आत्ता. आम्हाला दादांनी आमच्यासाठी काय केलं तेवढंच तुम्हाला सांगायचं होतं.आम्ही सर्वजण तुमच्याच सोबत आहे, रामनवमीच्या कार्यक्रमाला मात्र नक्की यायचं तुम्ही. निमंत्रण घेऊन येतोच’, असे आग्रहाने सांगितले.

“समाजाच्या शेवटच्या घटकाकडूनही गजर घडाळ्याचाच”

नक्की येईन, असं मनापासून त्यांना सांगितलं आणि निघाले.आज अवघ्या काही वेळात केवढ्या वेगवेगळ्या पातळीवर वेगवेगळ्या घटकातील जनतेचे राष्ट्रवादी काँग्रेस, अजितदादा यांच्यावरील प्रेम, विश्वास आणि हक्क दिसून आला. दिवसाचे सोळा-अठरा तास हा माणूस अक्षरशः राबतोय, झिजतोय ते कशाप्रकारे रुजलंय याचं दर्शन शेती,उद्योग क्षेत्रात असणाऱ्या चव्हाण कुटुंबियांच्या वस्तीवर झालं, राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या माहेरचे वंशज राजे जाधवराव यांच्या वाड्यात झालंच आणि परतताना वाटेत जोशी समाज बांधव भेटून रस्त्यावर देखील झालं. राष्ट्रवादीवरील हे प्रेम व्यक्त केल्याबद्दल भगवान गोंडे, शेखर गोंडे, संतोष सुपेकर, गौरव साळुंखे, अरुण गोंडे, अमर गोंडे, धीरज पवार आदी बंधू, भगिनी या सर्वांचे मनापासून आभार.

अशी पोस्ट सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी केली आहे. बारामती साथी सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार या प्रचारासाठी उतरल्या आहेत. त्यामुळे या ठिकाणी कोण बाजी मारणार, याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.अशात सुनेत्रा पवार यांच्या पोस्टची देखील चर्चा होत आहे.

News Title-Sunetra Pawar post in discussion

महत्त्वाच्या बातम्या –

शिंदे गटाचा नेता मुख्यमंत्री होणार?, बॅनरबाजीने चर्चांना उधाण

शरद पवार आणि महादेव जानकर यांची भेट?; महादेव जानकरांचा अखेर खुलासा

सर्वसामान्यांना मोठा झटका! 800 पेक्षा अधिक औषधे महागणार

दिलासादायक बातमी! पुढील 10 दिवस गॅस सिलेंडर मिळणार मोफत

मुंबईकरांनो पाणी जपून वापरा; पुढील ‘इतके’ दिवस पाणीकपात होणार