“माझा व्हिडीओ एडिट करुन…”; मनोज जरांगेंकडून सगळ्यात मोठा गौप्यस्फोट!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Manoj Jarange | राज्यात एकीकडे लोकसभा निवडणूकीची चर्चा असताना दुसरीकडे मराठा आंदोलनावर वातावरण तापल्याचं दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासन मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा राज्यात जाऊन जाहीर सभा घेत आहेत. त्यांच्या सभेला लाखो मराठा बांधव पाठिंबा देत आहेत. सभा सुरु असताना अनेक वेळा जरांगेंनी सरकारवर जोरदार टिका केली. याशिवाय राजकारणातल्या मंत्र्यांच्या देखील जरांगे यांनी शाळा घेतली. दरम्यान, यावेळी जरांगे पुन्हा एकदा राज्याच्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर भडकले आणि त्यांच्यावर गंभीर आरोप केले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर केले आरोप :

जोपर्यंत मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत मी मागे हटणार नाही असं मनोज जरांगे (Manoj Jarange) म्हणाले आहेत. बीडमध्ये मनोज जरांगेंची जाहीर सभा पार पडली. यावेळी जरांगेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करत हल्लाबोल केला आहे. जरांगे म्हणाले, “देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी माझे नवीन व्हिडिओ काढायला सुरुवात केली आहे. एवढंच नाही तर ते व्हिडिओ ते एडिट करुन मला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत.

ओबीसीमधून आरक्षण घेणार- जरांगे :

पुढे जरांगेंनी (Manoj Jarange) आरक्षणवर भाष्य करत म्हटलं की, “ओबीसीमधून आरक्षण घेतल्याशिवाय मी आता थांबणार नाही, मेलो तरी हरकत नाही मात्र आरक्षण घेणारच. बीडच्या वडवणीमध्ये मनोज जरांगेंची जाहीर सभा झाली. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा सरकारवर जोरदार टीका केली आहे. राज्यातील एकही खासदार आणि विधानसभेचे सदस्य आता मी निवडून येऊ देणार नाही.”

आधी सरकारला सावध करणार :

आज लोकसभेचं बिगुल वाजल्यानंतर जरांगेंनी एक घोषणा करत सरकारला इशारा दिला आहे. जरांगे म्हणाले, सगेसोयरेची अंमलबजावणी न करता निवडणूक कार्यक्रम जाहीर करु नका. पुढे ते म्हणाले की,  सरकारला आधी सावध करणार नाही, आचारसंहिता लागू झाल्यानंतर आमची भूमिका मांडणार आहे. सत्ताधारांच्या अंगाला गुलाल लागू देणार नाही. यांचा जीव सत्तेत आहे. त्यामुळं त्यांना सत्ताच मिळू देणार नाही, मराठा समाज टोकाचा निर्णय घेणार असल्याचं देखील जरांगे म्हणाले.

News Title : manoj jarange talks about edited video

महत्त्वाच्या बातम्या-

पेट्रोल-डिझेलच्या किंमती आणखी कमी होणार?, पेट्रोलियम मंत्र्यांचं मोठं वक्तव्य

जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर ‘या’ सवयींचा त्याग करा!

जेवण करायचं असेल तर ‘या’ वेळेतच करा, नाहीतर… चाणक्याचं ऐकाल तर फायद्यात राहाल!

आता सर आणि मॅडम यांना सुद्धा गणवेश, महाराष्ट्र शासनानं घेतला मोठा निर्णय

अमिताभ बच्चन यांच्या प्रकृतीबद्दल मोठी अपडेट समोर; व्हिडिओ पाहून चाहते झाले हैराण