‘पहिला डाव वस्तादाचा,’ निलेश लंके यांच्या नव्या बॅनरबाजीची जोरदार चर्चा

 Nilesh Lanke Banner | पारनेरचे आमदार निलेश लंके  (Nilesh Lanke Banner) यांनी काल-परवा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या गटामध्ये प्रवेश केला आहे. अजित पवार यांच्यासाठी हा मोठा धक्का आहे. निलेश लंके यांनी मी कधी शरद पवार साहेबांपासून दूर नव्हतोच असं म्हणत त्यांनी आपली भावना व्यक्त केली. पुण्यामध्ये त्यांचा पुस्तक प्रकाशन सोहळा होता. निलेश लंके (Nilesh Lanke Banner) यांनी कोरोना काळातील अनुभव पुस्तकामध्ये नमूद केले आहेत.

दरम्यान, निलेश लंके यांना अहमदनगरमधून उमेदवारी देण्याची चर्चा आहे. निलेश लंके शरद पवार यांच्या गटामध्ये आल्यानंतर नगरचं वातावरण शरद पवार यांच्या बाजूनं फिरणार असल्याच्या चर्चा आहेत. दुसऱ्या बाजूला अजित पवार यांनी निलेश लंके यांच्या जाण्यावर वक्तव्य केलं. त्याच्या डोक्यात कोणीतरी हवा घातली, खासदार करतो. त्याची ओळख फक्त पारनेरपर्यंत मर्यादीत आहे, असं अजित पवार म्हणाले.

शरद पवार यांच्या भेटीनंतर निलेश लंके यांची गावोगावी बॅनरबाजी  (Nilesh Lanke Banner) करण्यात आली आहे. निलेश लंके हे तुळजापूरला देवीच्या दर्शनासाठी जाणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे त्यांच्या स्वागतासाठी डिजे वाजवत गावकऱ्यांनी त्यांचं स्वागत केलं आहे. तसेच रूईछत्तीशी या गावामध्य़े त्यांची बॅनरबाजी (Nilesh Lanke Banner) करण्यात आली आहे. पहिला डाव वस्तादाचा अशा आशयाचे बॅनर गावामध्ये लावण्यात आले आहेत.

काय आहे बॅनरवर?

पहिला डाव वस्तादाचा अशा आशयाचे बॅनरवर लिहिण्यात आलं आहे. तसेच त्या बॅनरवर शरद पवार निलेश लंके आणि त्यांच्या पत्नी राणी लंके यांचे देखील बॅनरवर फोटो दिसत आहेत. या बॅनरची राज्यभर चर्चा आहे. सर्वात महत्त्वाचं बॅनरवर तुतारी हे चिन्ह आहे.

गाड्यांच्या ताफ्यांवर तुतारी

निलेश लंके यांच्या गाड्यांच्या ताफ्यांमागे तुतारी चिन्ह लावण्यात आलं. तसेच निलेश लंके यांचे कार्यकर्ते तुळजापूरला देवीच्या दर्शनासाठी जाणार आहेत आणि निलेश लंके यांच्या लोकसभा विजयासाठी साकडं घालणार आहेत.

लंके यांनी कोरोना काळामध्ये चांगलं काम केलं आहे. त्यांनी याबाबत सांगत असताना मी आरोग्य मंदीर उभारलं आहे. त्यामध्ये 31 हजार लोकांवर उपचार करण्यात आले. त्या आरोग्य मंदिराला शरद पवार यांचं नाव दिलं आहे. शरद पवार साहेबांची अदृश्य ताकद असल्याचं निलेश लंके म्हणाले होते.

News Title – Nilesh Lanke Banner News Update

महत्त्वाच्या बातम्या

शिंदे गटाचा नेता मुख्यमंत्री होणार?, बॅनरबाजीने चर्चांना उधाण

शरद पवार आणि महादेव जानकर यांची भेट?; महादेव जानकरांचा अखेर खुलासा

सर्वसामान्यांना मोठा झटका! 800 पेक्षा अधिक औषधे महागणार

दिलासादायक बातमी! पुढील 10 दिवस गॅस सिलेंडर मिळणार मोफत

मुंबईकरांनो पाणी जपून वापरा; पुढील ‘इतके’ दिवस पाणीकपात होणार