उदयनराजे यांना उमेदवारी नाही; कार्यकर्ते आक्रमक, राजीनामा देण्याच्या निर्णयाची चर्चा

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Udayan raje Bhosale | भाजपचे नेते उदयनराजे भोसले (Udayan raje Bhosale) यांना यंदा भाजपने उमेदवारी न दिल्याने साताऱ्यात कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. भाजपच्या दोन याद्या जाहीर झाल्या आहेत. दुसऱ्या यादीमध्ये पंकजा मुंडे, रक्षा खडसे, स्मिता वाघ, हीना गावितपासून ते भाजपचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं नाव आहे, मात्र उदयनराजे (Udayan raje Bhosale) यांना तिकीट न दिल्याने कार्यकर्ते संतापले आहेत.

दोन याद्यांमध्ये उदयनराजेचं नाव नाही

भाजपने आगामी लोकसभा निवडणुकीच्या दोन याद्या जाहीर केल्या आहेत. दुसऱ्या यादीमध्ये 20 उमेदवारांचा समावेश आहे. यामध्ये उदयनराजे भोसले (Udayan raje Bhosale) यांचं नाव नाही. यामुळे आता उदयनराजे भोसले यांचे कार्यकर्ते संतापले आहेत. उदयनराजे (Udayan raje Bhosale) यांना उमेदवारी न दिल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

साताऱ्याच्या पोवई नाक्यावर उदयनराजे यांचे समर्थक आणि भाजपचे कार्यकर्ते उपस्थित राहिले. मराठा समाज देखील त्याठिकाणी एकवटला. त्यावेळी उदयनराजे भोसले यांच्या नावाने घोषणा दिल्या. उदयनराजे भोसले यांना उमेदवारी मिळाली पाहिजे अशी मागणी केली आहे.

उदयनराजे यांचं दुसऱ्या यादीमध्ये नाव नव्हतं. यामुळे आता मराठा कार्यकर्ते आणि उदयनराजे यांच्या समर्थकांनी संताप व्यक्त केला. राजेंनी निवडणूक लढवण्याबाबत मागणी केली आहे. तसं न झाल्यास कार्यकर्ते राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत.

स्वबळावर निवडणूक लढवावी

उमेदवारी मिळत नसेल तर उदयनराजे यांनी स्वबळावर निवडणूक लढवावी अशी समर्थक आणि कार्यकर्त्यांची मागणी आहे. कार्यकर्ते आक्रमक असून साताऱ्यातील पोवई नाका येथे आले आहेत. त्यांनी उदयनराजे यांच्या नावाच्या घोषणा दिल्या आहेत.

राजीनामे तयार

उदयनराजे यांना निवडणूक लढवण्यासाठी उमेदवारी मिळावी अशी कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे. पुढील काळात जर उमेदवारी न मिळाल्यास कार्यकर्ते राजीनामा देणार असून राजीनामे रात्रीच तयार करण्यात आले आहेत.

News Title – Udayan raje Bhosale Shuold Contents Lok Sabha Independently

महत्त्वाच्या बातम्या

दिलासादायक बातमी! पुढील 10 दिवस गॅस सिलेंडर मिळणार मोफत

मुंबईकरांनो पाणी जपून वापरा; पुढील ‘इतके’ दिवस पाणीकपात होणार

राष्ट्रवादी-शिवसेनेत वादाची ठिणगी?; बड्या नेत्याने श्रीकांत शिंदेंना सुनावलं

टप्पू-बबिताच्या साखरपुड्याच्या चर्चेदरम्यान TMKOC टीमच्या ‘त्या’ पोस्टने वेधलं लक्ष

‘कमी वयात मला कळलं होतं’; अभिनेत्री सारा अली खानचा मोठा खुलासा