Manoj Jarange | मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील गेल्या अनेक महिन्यांपासून मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी आंदोलन करत आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी जरांगे पाटील लढा देत आहेत. मराठा समाजाला 10% टक्के स्वतंत्र आरक्षण दिलं तरी देखील जरांगेंना ते मान्य नव्हतं. अखेर त्यांनी सरकारने दिलेलं 10% आरक्षण मान्य केलं. मात्र, ओबीसीमधून आरक्षण पाहिजे त्यासाठी जरांगेंनी पुन्हा एकदा आंदोलन सुरु केलं आहे. दरम्यान, या वेळी बोलत असताना जरांगेंनी पुन्हा एकदा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
काय म्हणाले जरांगे?
मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावं यासाठी जरांगे (Manoj Jarange) गावागावात जाऊन संवाद यात्रा करत आहेत. शिवाय मराठा बांधवांना आपल्यासबोत घेऊन ते या संदर्भात सभा घेत आहे. दरम्यान, बीडमध्ये जरांगेंची जाहीर सभा पार पडली. या वेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला. जरांगे पाटील म्हणाले की, फडणीवसांनी मला मराठ्यांपासून लांब केलं. मला बदनाम केलं.
पोलीस सुरक्षा कमी केली. फडणवीस आणि भाजप मला संपवण्याचा डाव टाकत आहे, असं वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केलं. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी लक्षात घ्यावं, की सहा कोटी मराठा ओलांडून माझ्यापर्यंत यायचं आहे असा इशारा जरांगे पाटलांनी दिला आहे.
बदनाम करण्याचा प्रयत्न-
बीड येथे सभा स्थळी बोलत असताना जरांगे (Manoj Jarange) म्हणाले की, गेल्या अनेक दिवसांपासून माझ्यावर आरोप केले जात आहेत. मराठा बांधवानपासून लांब करण्याचा प्रयत्न केला. एवढंच नाही तर, देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी माझे नवीन व्हिडिओ काढायला सुरुवात केली आहे. ते व्हिडिओ ते एडिट करुन मला बदनाम करण्याचा प्रयत्न चालू केल्याचे मनोज जरांगे पाटील म्हणाले.
मराठ्यांना माझा शब्द-
“माझा मराठ्यांना शब्द आहे. जेलमध्ये सडेल पण तुमच्याशी गद्दारी करणार नाही. देवेंद्र फडवणीस चिल्लर चाळे करतात. मस्ती करणाऱ्याला आव जाव करत नसतात. मराठ्यांच्या नादी लागाल, तर तुमचं राजकारण संपून जाईल,” असं देखील जरांगे म्हणाले.
News Title : manoj jarange on dcm devendra fadnavis
महत्त्वाच्या बातम्या-
आचारसंहिते संदर्भात प्रत्येक राजकीय नेत्यांसह नागरिकांना ही माहिती असायलाच हवी!
उदयनराजे राजकारणातून संन्यास घेणार का?, केला सर्वात मोठा खुलासा
आचारसंहिता म्हणजे काय? या दरम्यान कोणत्या गोष्टींवर बंदी असते
तरुणांसाठी खुशखबर; सेबीमध्ये नोकरीची संधी! ‘या’ तारखेपर्यंत करू शकता अर्ज
तुमच्या स्वप्नातील कार खरेदी करण्याचं स्वप्न होणार साकार; जबरदस्त फीचर्ससह CNG कार बाजारात येणार