जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर ‘या’ सवयींचा त्याग करा!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Chanakya Niti | भारतीय राजकीय विचारवंत, राजकीय तत्वज्ञानी, राजकीय धोरण निर्माता, शिक्षक, सम्राट चंद्रगुप्त मौर्य यांचे सल्लागार आचार्य चाणक्य हे भारतीय इतिहासातील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व होते. चाणक्य यांनी जीवनाच्या प्रत्येक पैलूवर काही न काही तत्वज्ञान सांगितले आहे. जीवनात येणाऱ्या अडचणी असो किंवा जीवनात मनुष्याने काय करावे आणि काय करू नये, याबाबत त्यांनी काही तत्वे सांगितली आहे. त्यांच्या या तत्वांचे पालन केले तर जीवनातील कोणत्याही अडचणीतून तुम्ही सहजरीत्या बाहेर पडू शकता.

चाणक्य यांनी जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर काही गोष्टींचा त्याग करावा असं म्हटलं आहे. तसंच काही गोष्टी कायम लक्षात घ्याव्यात असं ते म्हणतात. चाणक्य यांच्या मते, या चार सवयींमुळे माणसाला जीवनात अनेक संकटांना सामोरे जावं लागतं. जर एखाद्या व्यक्तीने या सवयी सोडल्या किंवा बदलल्या तर त्याला मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागणार नाही. चला तर मग जाणून घेऊया काय आहेत त्या सवयी.

पैशांची बचत :

आचार्य चाणक्य (Chanakya Niti ) म्हणतात की, माणसाने आवश्यकतेपेक्षा जास्त खर्च करू नये. त्यांच्या मते, खूप काटकसर असलेल्या व्यक्तीला जीवनात अनेक संकटांना सामोरं जावं लागतं. विचार न करता पैसे खर्च करणाऱ्या व्यक्तीला नेहमी पैशांची कमतरता भासते ज्यामुळे त्याला इतर अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे पैसे जपून खर्च करायला हवेत. व्यक्तीने पैशांची बचत करायला हवी. याबाबत कुणालाही जास्त सांगू नये. कारण, हीच बचत कठीण प्रसंगी कामी पडते.

तुमची कमजोरी कोणाला सांगू नका :

आचार्य चाणक्य म्हणतात की, स्वतःची कमजोरी कोणाला सांगू नये. त्रासलेली व्यक्ती अनेकदा आपली कमजोरी आपल्या मित्राला, वर्गमित्राला किंवा सहकाऱ्याला सांगते.त्यामुळे ते त्या कमकुवतपणाचा फायदा घेतात, त्यामुळे भविष्यात तो दुःखी होतो. त्यामुळे आपली कमजोरी सांगू नये.

कोणाशीही भेदभाव किंवा तुलना करू नका :

ज्या व्यक्तीमध्ये भेदभावाची भावना असते तो कधीही आनंदी राहत नाही. जो व्यक्ती नेहमी तुलना करतो तो व्यक्ती कधीच समाधानी नसतो.नेहमी अधिकची इच्छा ठेवून, तो स्वतःला उध्वस्त करतो. (Chanakya Niti ) त्यामुळे कुणाशीच तुलना किंवा भेदभाव करू नये.

आळशी होऊ नका :

आळस हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. आचार्य चाणक्य म्हणतात की, जो माणूस आळशी असतो त्याला कधीच यश मिळत नाही. असा माणूस नेहमी उद्यापर्यंत आपले काम पुढे ढकलत राहतो, त्यामुळे त्याला जीवनात अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं. त्यामुळे तो नेहमी दुःखी राहतो.

News Title :  Chanakya niti for Success in life

महत्वाच्या बातम्या- 

शिंदे गटाचा नेता मुख्यमंत्री होणार?, बॅनरबाजीने चर्चांना उधाण

शरद पवार आणि महादेव जानकर यांची भेट?; महादेव जानकरांचा अखेर खुलासा

सर्वसामान्यांना मोठा झटका! 800 पेक्षा अधिक औषधे महागणार

दिलासादायक बातमी! पुढील 10 दिवस गॅस सिलेंडर मिळणार मोफत

मुंबईकरांनो पाणी जपून वापरा; पुढील ‘इतके’ दिवस पाणीकपात होणार