सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी; केंद्र सरकारची मोठी घोषणा

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

नवी दिल्ली | गेल्या अनेकदिवसांपासून घरगुुती गॅस सिलेंडरच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत. यामुळे सर्वसामान्यांसह गृहणीचं बजेटदेखील बिघडलं आहे. याचसंदर्भात केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्री हरदीप सिंहपुरी (Hardeep Singhpuri) यांनी लोकसभेत मोठी घोषणा केली आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात घरगुती गॅसच्या किमती कमी झाल्यास केंद्र सरकार घरगुती गॅसच्या किमतीत घट करु शकते. शिवाय सबसिडीमार्फत दिलासा देखील देऊ शकते. आंतरराष्ट्रीय बाजारात (International market) सगळ्या गोष्टी अनुकूल झाल्यास गॅसदरात कपात करुन सबसिडी वाढू शकते. यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे.

सध्या सरकार 60 टक्के गॅसची आयात (import) करतं. सऊदी करार (Saudi deal) दरात गेल्या दोन वर्षात 200 डाॅलर प्रति मॅट्रिक टनने वाढ झाली आहे. सध्या याची किंमत 900 डाॅलर मॅट्रिक टन आहे याची किंमत 750 डाॅलर प्रति मॅट्रिक टन किंवा त्यापेक्षाही कमी झाल्यास घरगुती गॅस सिलेंडर किफायतशीर दरांवर व्रिकी करता येईल, असं पुरी यांनी सांगितलं.

तसेच मध्यंतरी सरकारने सबसिडीच्या (subsidy) दरांबाबत सामान्यांची चेष्टा चालवली होती. अगदी 2-3 रुपयांची सबसिडी ग्राहकांच्या खात्यावर जमा करण्यात येत होती. संसदेत बोलताना मात्र पुरींनी 200 रुपयांची सबसिडी देण्यात येत होती असा दावा केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या