कोरोनाने पुन्हा टेंशन वाढवलं; ‘या’ जिल्ह्यात पुन्हा मास्कची सक्ती

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | कोरोनाने (Corona) पुन्हा एकदा महाराष्ट्राचं टेंशन वाढवलं आहे. सातारा (Satara) जिल्ह्यात सीजनल इन्फ्लुएंजा आणि कोरोना बाधितांचा आकडा वाढत आहे.

वाढत्या रूग्णांमुळे जिल्हा प्रशासनाने तातडीने पावले उचलायला सुरुवात केली आहे. जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी एक परिपत्रक काढून सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरण्याचे आदेश दिले आहेत.

सातारा जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, बँका, शाळा, महाविद्यालये यामधील सर्व शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी खबरदारीचा उपाय म्हणून मास्कचा वापर करणे अनिवार्य करण्यात आले आहे.

दरम्यान, सातारा जिल्ह्यात 53 कोरोना रुग्ण असून यातील दोघांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोणताही धोका अधिक पोहोचू नये म्हणून ही खबरदारी घेण्यात येत आहे.

महत्त्वाच्या बातम्या-