Rupali Chakankar | रुपाली चाकणकरांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी, नेमका काय आहे प्रकार?

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

पुणे । राज्य महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकरांनी (Rupali Chakankar) बळीराजांचा अवमान करुन धार्मिक भावना दुखवल्याबद्दल कायदेशीर गुन्हा दाखल करण्याची मागणी पुणे जिल्हा संभाजी ब्रिगेडने केली आहे. राज्यभर निदर्शने व जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन चाकणकरांविरूद्ध कारवाई करण्यासाठी तसेच त्यांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरुन पदमुक्त करण्याच्या मागणीसाठी पुण्यातही निदर्शनं करण्यात आली.

रूपाली चाकणकरांनी (Rupali Chakankar) 14 नोव्हेंबर रोजी फेसबुकवरुन बहुजनांचा राजा बळीराजाच्या मस्तकावर वामनाने पाय दिल्याचा काल्पनिक फोटो पोस्ट केल्याचा संभाजी ब्रिगेडचा आरोप आहे, त्यानंतर यासंदर्भातील वादाला सुरुवात झाली होती. या प्रकरणी संभाजी ब्रिगेडने आता आक्रमक भूमिका घेतली आहे.

संभाजी ब्रिगेडनं काय म्हटलं आहे?

“मुळात राज्यातला शेतकरी वर्ग महासम्राट बळीराजाला आपली अस्मिता मानतो. दिवाळी बलीप्रतिपदेच्या दिवशी शेतात बळीपूजन करतो. इतिहासात बळीराजाला वामन या आक्रमकाने कपटाने ठार मारले. हा प्रसंग महात्मा ज्योतिबा फुल्यांनी आपल्या गुलामगीरी या ग्रंथात सिद्ध केला. बळीराजाला इथला बहूजन पुर्वज मानतो, त्याच्या डोईवर आक्रमक वामनाने पाय ठेऊन पाताळात घालणारे काल्पनिक चित्र प्रसारीत करणे म्हणजे आपल्या पुर्वजांचा वारसा नाकारून वामनाचे उदात्तीकरण करणे होय, असा आरोप संभाजी ब्रिगेडनं केला आहे.

दरम्यान, रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांच्या या पोस्टमुळे मराठा, बहुजन व शेतकरी वर्गाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहे. त्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल व्हावा, अशी मागणी संभाजी ब्रिगेडकडून करण्यात आली आहे.

Rupali Chakankar यांच्यावर अन्य सुद्धा आरोप-

संभाजी ब्रिगेडनं दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की “या पोस्टबाबत काही प्रश्न उपस्थित झाल्यानंतर पोलीस प्रशासनावर दबाव टाकून प्रश्न विचारणाऱ्यांवरच कारवाई करण्याचा प्रकार घडला आहे. संविधानिक पदावर बसल्या असताना चाकणकर यांनी महापुरूष बळीराजांचा वारसा नाकारत वामनाचे उदात्तीकरण केले. त्याचप्रमाणे प्रशासनाला खोटी माहिती देत सामाजिक संघटनेची व पदाधिकाऱ्याची नाहक बदनामी केली आहे. अशा असंवैधानिक पदाचा दुरूपयोग करणाऱ्या चाकणकरांना पदमुक्त करण्यात यावं.”

रुपाली चाकणकर यांच्याविरोधात कारवाई करण्याच्या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली. यावेळी “इडा पिडा टळो, बळीचं राज्य येवो” अशा घोषणा देण्यात आल्या. संभाजी ब्रिगेड प्रदेश संघटक प्रदिप कणसे, सहसंघटक अशोक काकडे, विभागीय अध्यक्ष हर्षवर्धन मगदूम, प्राची दुधाणे, ज्योती गायकवाड, उत्तर जिल्हाध्यक्ष गणेश दहिभाते, पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष सतीश काळे, पुणे शहराध्यक्ष प्रशांत कुंजीर, उपाध्यक्ष वैभव शिंदे, हवेली तालुकाध्यक्ष प्रशांत नरवडे, नागराज लावंड, गणेश कुंजीर, कैलास कणसे, राणाप्रेमजितसिंह पवार, प्रशांत तापकीर आणि शिवदास मोरे यावेळी उपस्थित होते.

महत्त्वाच्या बातम्या- 

Crime | खतरनाक प्लॅनिंग; ठाण्यातील हत्याकांडाने महाराष्ट्रात खळबळ

Rohit Sharma | रोहित शर्मा फिट नाही?, बीसीसीआयचा सर्वात मोठा खुलासा

Madhya Pradesh CM | मध्य प्रदेशात भाजपचा मोठा धक्का, ‘या’ नेत्याला केलं मुख्यमंत्री

Maharashtra News | सर्वात मोठी बातमी! मराठवाड्यातील ‘या’ भागात नागरिकांना धोका

HDFC बँकेची मोठी घोषणा; ‘या’ लोकांना फायदाच फायदा