OUT or NOT OUT? क्रिकेट विश्वात घडलेल्या ‘या’ प्रकाराची संपू्र्ण जगात चर्चा

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

OUT or NOT OUT? | क्रिकेट हा फारच अनिश्चिततेचा खेळ मानला जातो. या खेळात कोणता खेळाडू कोणत्या चेंडूवर आऊट होईल हे कुणालाही सांगता येत नाही. या खेळात अनेकदा असं देखील पहायला मिळतं की गोलंदाज स्टंम्प हिट करतो मात्र तरी देखील काही वेळा फलंदाजाला आऊट दिलं जात नाही. याला कारणं अनेक असू शकतात. मात्र नुकतीच एक घटना घडली आहे तिची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होताना पहायला मिळत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये स्टम्प पहायला मिळत आहे. तीन स्टम्पपैकी मधला स्टम्प गोलंदाजाने उडवला आहे, मात्र तरी त्यावरील बेल्स जशाच्या तशा असल्याचं या फोटोमध्ये पहायला मिळत आहे. हा फोटो इंटरनेटवर मोठ्या वेगानं व्हायरल होत आहे. काही लोक तर हा फोटो पाहून चांगलेच हैराण झाले आहेत.

नेमका कुठं घडला हा प्रकार?

गिनिंडेरा क्रिकेट क्लब आणि वेस्ट डिस्ट्रिक्ट क्रिकेट क्लब यांच्या दरम्यान सुरु असलेल्या सामन्यात हा प्रकार पहायला मिळाला. क्रिकेट एसीटीने आपल्या एक्स (पूर्वीचं ट्विटर) अकाउंटवरुन हा फोटो शेअर केला आहे. अशी गोष्ट तुम्हाला रोज पहायला मिळत नाही, असं त्यांनी या फोटोच्या कॅप्शनमध्ये म्हटलं आहे. (OUT or NOT OUT?)

गिनिंडेरा वर्सेस वेस्ट सामन्यात झालेल्या या घटनेकडे नीट पाहून सांगा हे कसं झालं असेल. फिजिक्स?च्विंगम? की पावसामुळे बेल्स फुगल्या?, असा सवाल देखील या अकाऊंटवरुन विचारण्यात आला आहे.

सामन्यादरम्यान नेमकं काय घडलं?

गिनिंडेराचा गोलंदाज एंडी रेनाल्ड्सने समोरच्या टीमचा सलामीचा खेळाडू मैथ्यू बोसुस्टोला बाद केलं. चेंडूचा वेगच एवढा होता की फलंदाजाला अंदाज आला नाही आणि चेंडू थेट मधल्या स्टंपला उखडून गेला. त्यानंतर गोलंदाजाच्या आनंदाला उधाण आलं, फलंदाज सुद्धा पव्हेलियच्या दिशेनं जायला लागला मात्र खेळ इथंच संपला नव्हता. (OUT or NOT OUT?)

OUT or NOT OUT? नियम काय सांगतो?

मेरिलबोन क्रिकेट क्लबच्या नियम 29 नूसार, फलंदाजाला तेव्हाच बाद दिलं जातं जेव्हा स्टंपवरील बेल्स पूर्णपणे आपल्या जागेवरुन हलून खाली पडल्या असतील किंवा एक किंवा दोन स्टंम्प पूर्णपणे उखडलेले असतील. दरम्यान, या सामन्यात असा कुठलाही प्रकार घडलेला नव्हता त्यामुळे गोलंदाजाच्या मेहनतीवर पाणी पडलं आणि मैथ्यूला जीवदान मिळालं. आता ही घटना क्रिकेट विश्वात वाऱ्यासारखी व्हायरल होत आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

Crime | खतरनाक प्लॅनिंग; ठाण्यातील हत्याकांडाने महाराष्ट्रात खळबळ

Rohit Sharma | रोहित शर्मा फिट नाही?, बीसीसीआयचा सर्वात मोठा खुलासा

Madhya Pradesh CM | मध्य प्रदेशात भाजपचा मोठा धक्का, ‘या’ नेत्याला केलं मुख्यमंत्री

Maharashtra News | सर्वात मोठी बातमी! मराठवाड्यातील ‘या’ भागात नागरिकांना धोका

HDFC बँकेची मोठी घोषणा; ‘या’ लोकांना फायदाच फायदा