‘सत्तेची हवा…’; अण्णा हजारेंकडून देवेंद्र फडणवीसांचं तोंडभरून कौतुक

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

अहमदनगर | ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hajare) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचं तोंडभरून कौतुक केलं आहे. ते राळेगणसिद्धीमध्ये माध्यमांशी बोलत होते.

लोकपालच्या धर्तीवर राज्यात लोकायुक्त नियुक्त करण्याची मागणी होती. यासाठी गेल्या बारा वर्षांपासून हजारे यांनी विविध आंदोलने केली.

अखेर यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या त्यांचाच समावेश असलेल्या समितीचा अहवाल राज्य सरकारने स्वीकारला. या मसुद्याला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात येऊन हे विधेयक नागपूरमध्ये सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात ठेवण्यात येणार आहे.

लोकायुक्त कायद्याचं विधेयक विधिमंडळात येत असल्याने यासाठी पाठपुरावा करत असलेले अण्णा हजारे यांनी सरकारचं कौतुक करत समाधान व्यक्त केलं आहे.

सत्तेची हवा डोक्यात गेल्यावर अनेक लोक बदलतात. मात्र काही लोक ध्येयवादी नागरिकांच्या हिताचे निर्णय घेत असतात, असं अण्णा हजारे म्हणालेत.

राज्य सरकारचा हा निर्णय राज्यासाठी समाधानकारक आहे. लोकायुक्त हा स्वायत्ता असलेला कायदा आहे. लोकायुक्त कायद्याला न्यायालयाचा दर्जा आहे. हा कायदा इतरांपेक्षा वेगळा आहे, असं अण्णा हजारे म्हणालेत.

महत्त्वाच्या बातम्या-