‘या दिवशी लग्न करणार’, प्रभासचा लग्नाबद्दल मोठा खुलासा
मुंबई | साऊथचा सुपरस्टार प्रभासनं(Prabhas) आपल्या अभिनयानं सर्वांची मन जिंकली आहेत. त्याच्या ‘बाहुबली'(Bahubali)आणि ‘बाहुबली 2’ (Bahubali 2) या चित्रपटानं तर प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावलं होतं. त्याची भारतभर मोठी क्रेझ आहे. त्याच्या चित्रपट आणि वैयक्तिक आयुष्याबाबत जाणून घेण्यास चाहते नेहमीच उत्सुक असतात.
त्यातच प्रभास लग्न कधी करणार आणि कोणासोबत करणार हे जाणून घेण्यास चाहते आतुर झाले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी प्रभास बाॅलिवूड(Bollywood) अभिनेत्री क्रिती सेनाॅन(Kriti Sanon)सोबत रिलेशनशिपमध्ये आहे आणि ते दोघं लवकरच लग्न करणार असल्याच्याही जोरदार चर्चा होत्या.
परंतु प्रभाससोबतच्या नात्यावर मौन तोडत क्रितीनं सोशल मीडियावर भली मोठी पोस्ट केली होती. या पोस्टद्वारे ते दोघं रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा खोट्या असल्याचं तिनं सांगितलं होतं.
नुकताच प्रभासला प्रश्न विचारण्यात आला होता की, तो लग्न कधी करणार आहे?, यावर प्रभासनं भलतेच उत्तर दिलं आहे. तो म्हणाला सलमान खान जेव्हा लग्न करेल तेव्हा मी लग्न करेल. प्रभासनं दिलेल्या या उत्तराच्या सोशल मीडियार जोरदार चर्चा रंगल्या आहेत.
दरम्यान, प्रभास आदिपुरूष चित्रपटानंतर सालार, स्पिरिट तसेच प्रोजेक्ट के या चित्रपटात झळकणार आहे. त्याचे चित्रपट पाहण्यास त्याचे चाहते नेहमीच उत्सुक असतात.
महत्वाच्या बातम्या-
- विजयानंतर मेस्सीने चाहत्यांना दिला मोठा धक्का!
- ‘या’ प्रोसेसद्वारे चुकीच्या खात्यात गेलेले पैसे मिळवा परत
- ‘मंत्री व्हायचंय का?’; सभागृहात ठाकरेंच्या आमदाराला देवेंद्र फडणवीसांनी दिली ऑफर
- 800 किमी पर्यंत धावणाऱ्या ‘या’ इलेक्ट्रिक बाईकची होतेय जोरदार चर्चा
- देश पुन्हा हादरला; प्रियकराने प्रेयसीसोबत जे केलं ते ऐकून तुम्हालाही बसेल धक्का
Comments are closed.