शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी; एकनाथ शिंदेंनी केली महत्त्वाची घोषणा

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | नाशिकहून मुंबईच्या दिशेने काढण्यात आलेल्या शेतकरी (Farmer) लाँग मार्चला अखेर यश आलं आहे. शेतकऱ्यांच्या आंदेलनाला यश आले असून शेतकऱ्यांच्या सर्व प्रमुख मागण्या शिंदे फडणवीस (Shinde-Fadnavis) सरकारने मान्य केल्या आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत शेतकऱ्यांच्या लाँग मार्चबाबत विधानसभेत निवदेन करत मागण्या मान्य करत असल्याचं जाहीर केलं आहे.

कांद्याला देण्यात येणाऱ्या अनुदानात वाढ करण्यात आली आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना 350 रुपयांचे अनुदान देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. कांद्यामध्ये झालेली घसरण लक्षात घेऊन 300 रुपयांवरुन आणखी 50 रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधानसभेत म्हणाले.

दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा दिला असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी सांगितली. खरंतर ते अमरावती येथील टेक्स्टाईल पार्क विषयी सांगत होते. त्याचवेळी त्यांनी कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा उल्लेख करत त्यांनाही दिलासा मिळेल, अशी माहिती दिली.

महत्त्वाच्या बातम्या-