फिनालेपूर्वीच गौतमनं सांगितलं बिग बाॅस 16 च्या विजेत्याचं नाव

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | बिग बाॅस((Bigg Boss) हा सर्वात लोकप्रिय शोपैकी एक आहे. बिग बाॅसची प्रेक्षकांमध्ये मोठी क्रेझ आहे. त्यातच आता बिग बाॅस 16 (Bigg Boss 16) चे फिनाले जवळ आले आहे, त्यामुळं या सीझनचा विजेता कोण ठरेल याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.

या सीझनच्या टाॅप ५ मध्ये अर्चना गौतम(Archana Gautam), शिव ठाकरे(Shiv Thakare), प्रियंका चहर चौधरी(Priyanka Chahar Choudhary), शालीन भानोत(Shalin Bhanot) आणि एमसी स्टेन (MC Stan)आहेत. आता या पाचजणांपैकीच कोणीतरी एक विजेता ठरणार असल्यानं प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

आता कोण विजेतेपदाचा मुकुट पटकवणार याबाबत सोशल मीडियावर नेटकरी आपले मत व्यक्त करत आहेत. त्यातच बिग बाॅस सीझन ८ चा विजेता गौतम गुलाटीने या सीझनचा विनर आताच सांगून सगळ्यांनाच बुचकळ्यात पाडलं आहे.

गौतम गुलाटीनं एक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये त्यानं लिहिलं आहे की, प्रियंका को ट्राॅफी और स्टेन के गाणे पे रील तो बनती है. गौतमचे हे ट्विट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

दरम्यान, गौतमनं हे ट्विट प्रियंकाच्या समर्थनार्थ केलं आहे. परंतु या ट्विटनंतर सोशल मीडियावर प्रियंकाच विजय ठरणार आहे असं वाटतंय, अशा आशयाच्या कमेंट्स येत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-