INDvSA | शमी-चहर दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून बाहेर, कोणीच ओळखत नाही अशा खेळाडूला संधी!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

INDvSA | भारतीय क्रिकेट संघ सध्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर (India South Africa Tour) आहे. दोन्ही संघांमध्ये नुकतीच एक T20 मालिका पार पडली, यामध्ये दोन्ही संघांना संयुक्त विजेते म्हणून घोषित करण्यात आलं. यानंतर आता भारतीय संघाची एक वनडे आणि एक कसोटी मालिका सुद्धा दक्षिण आफ्रिकेसोबत होणार आहे, मात्र या मालिकेपूर्वीच भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे.

भारतीय संघाच्या प्रमुख गोलंदाजांपैकी एक असलेला मोहम्मद शमी (Mohammed Shami) कसोटी मालिकेतून बाद झाला आहे, तर दुसरीकडे आणखी एक महत्त्वाचा गोलंदाज असलेला दीपक चहर (Deepak Chahar) सुद्धा वनडे मालिकेतून बाद झाला आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेट संघासाठी (Team India) हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे.

नेमका काय घडला प्रकार?

नुकत्यात पार पडलेल्या वनडे वर्ल्डकपमध्ये मोहम्मद शमीनं जबरदस्त कामगिरी केली होती. तब्बल 24 विकेट्स काढून त्याने प्रतिस्पर्धी संघाचं कंबरडं मोडलं होतं. दक्षिण आफ्रिका दौऱ्यात होणाऱ्या टी20 आणि वनडे सामन्यांसाठी त्याला विश्रांती देण्यात आली होती. कसोटी मालिकेसाठी तो 15 डिसेंबरला दक्षिण आफ्रिकेसाठी रवाना देखील होणार होता, मात्र त्याच्या घोट्याच्या दुखापतीने उचल खाल्ल्याची माहिती आहे.

बीसीसीआयच्या मेडिकल टीमने मोहम्मद शमीला दक्षिण आफ्रिका दौऱ्यात खेळण्यास मनाई केली आहे. भारतासाठी हा एक मोठा धक्का असतानाच आता दीपक चहर सुद्धा वनडे मालिकेसाठी भारतीय संघाचा भाग नसणार असल्याचं समोर आलं आहे. कुटुंबातील जवळच्या व्यक्तीच्या आजारपणामुळे दीपक चहरला ऐनवेळी दौऱ्यातून माघार घ्यावी लागली आहे.

बीसीसीआयने (BCCI) एका पोस्टद्वारे यासंदर्भात माहिती दिली आहे. त्यामुळे भारतीय संघाचे दोन प्रमुख गोलंदाज संघात नसणार आहेत आणि भारतासाठी ही एक अत्यंत गंभीर बाब आहे. त्यामुळे आता नव्या गोलंदाजांची निवड करण्याचं बीसीसीआयपुढे आव्हान होतं, मात्र बीसीसीआयने निवडलेल्या नव्या नावामुळे सगळेच अवाक् झाल्याचं पहायला मिळत आहे.

भारतीय संघात नवा गोलंदाज-

मोहम्मद शमी दुखापतीमुळे जायबंदी झाल्याने आणि दीपक चहर वैयक्तिक कारणाने उपलब्ध नसल्याने बीसीसीआयने नव्या खेळाडूला दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी संधी दिली आहे. आकाश दीप (Akash Deep) असं या गोलंदाजाचं नाव आहे. आकाश दीपला फारसे क्रीडा रसिक ओळखत नसतील, मात्र तो बंगालच्या संघासाठी खेळतो. त्याने आतापर्यंत 25 फर्स्टक्लास, 28 लिस्ट A आणि 41 टी 20 सामने खेळले आहेत. आता दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अंतिम संघात संधी मिळाली तर आकाश कशी कामगिरी करतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

News Title: indvsa mohammed shami ruled out akash deep replaces deepak chahar

महत्त्वाच्या बातम्या-

Mumbai Indians | हार्दिक पांड्याला कर्णधार केल्याने सूर्यकुमार यादव नाराज?, उचललं ‘हे’ पाऊल

Aishwarya Rai-अभिषेक बच्चन यांचा घटस्फोट होणार नाही, मोठी माहिती समोर!

Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीसांचा शरद पवारांवर गंभीर आरोप, राजकीय वर्तुळात खळबळ

Crime | आपल्यांनीच घात केला; शेतीच्या वादातून घडला अत्यंत धक्कादायक प्रकार

‘फ्रेंड्स’ फेम Matthew Perry च्या मृत्यूचं कारण समोर; ऑटोप्सी रिपोर्टमधून मोठा खुलासा