Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीसांचा शरद पवारांवर गंभीर आरोप, राजकीय वर्तुळात खळबळ

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Devendra Fadnavis | मराठा आरक्षणावरून राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधक वारंवार आमनेसामने येताना दिसत आहे. अशात मराठा आरक्षणावरून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद (Sharad Pawar) पवारांवर थेट आरोप केले आहेत.

Devendra Fadnavis यांचा पवारांवर गंभीर आरोप

मराठा आरक्षणाला सर्वात मोठा विरोध हा शरद पवारांनी केला होता. तसेच शरद पवारांना कधी मराठा समाजाला आरक्षण द्यायचं नव्हतं, असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला संबोधित करताना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पवारांवर निशाणा साधला.

शरद पवारांना मराठा समाजाला कधी आरक्षण द्यायचं नव्हतं. स्वत:च्या नेतेपदासाठी शरद पवारांनी समाजांला झुंझवत ठेवल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शरद पवारांवर केला आहे.

“मराठा आरक्षणाला पवारांनी विरोध केला”

मराठा आरक्षणाला शरद पवार यांनीच विरोध केला होता. त्यांच्या मनात असतं तर मंडल आयोग लागू झाला तेव्हाच त्यांनी मराठ्यांना आरक्षण दिलं असतं. पण त्यांनी फक्त मराठा समाजाला झुंजवत ठेवायचं काम केलं, असं फडणवीसांनी (Devendra Fadnavis) सांगितलंय.

लोक आपल्याकडेच आले पाहिजेत हा त्यामागचा हेतू होता. मराठा आरक्षणाशिवाय दुसरे प्रश्न नाहीत का असं सुप्रिया सुळे महाविकास आघाडीचं सरकार असताना म्हणायच्या, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

आत्तासुद्दा आम्ही मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी प्रयत्नशील आहोत. मात्र, हे आरक्षण देताना ओबीसींवर कोणताही अन्याय होऊ देणार नाही. काहीही झालं तरी चालेल, असं आश्वासन फडणवीसांनी दिलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

Crime | आपल्यांनीच घात केला; शेतीच्या वादातून घडला अत्यंत धक्कादायक प्रकार

‘फ्रेंड्स’ फेम Matthew Perry च्या मृत्यूचं कारण समोर; ऑटोप्सी रिपोर्टमधून मोठा खुलासा

Ratan Tata | प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटांबाबत चिंताजनक माहिती समोर!

रोहितला कर्णधारपदावरून काढल्यानंतर Mumbai Indians ला मोठा धक्का!

Mumbai Indians | “आजपासून मी मुंबई इंडियन्सचा चाहता नाही”; लाखो जणांनी सोडली साथ!