पोलीस कोठडीत ललित पाटील याची प्रकृती बिघडली!

पुणे | ड्रग्स प्रकरणातील आरोपी ललित पाटील (Lalit Patil) याची तब्येत पुन्हा बिघडली आहे. गेल्या चार दिवसांपासून त्याला पोटदुखी आणि हर्नियाचा त्रास सुरू झाला आहे. परंतु त्याला आता ससून हॉस्पिटलमध्ये न नेता पोलीस कोठीतच उपचार दिले जात आहेत.

तज्ज्ञ डॉक्टरांकडून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. ललित पाटील याच्यावर यापूर्वी स्वत: ससून रुग्णालयाचे डीन डॉक्टर संजीव ठाकूर (Sanjeev Thakur) उपचार करत होते.

ललित पाटीलला टीबी आजारासह पाठदुखीचा देखील आजार असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. त्याला हार्नियाही झाला होता. लठ्ठपणाचा आजारही त्याला दाखवण्यात आला होता.

नाशिक जिल्ह्यातील रहिवाशी असलेल्या ललित पाटील कारगृहात होता. एका ड्रग्स प्रकरणात पुणे पोलिसांनी त्याला अटक केली होती. मागील तीन वर्षांपासून तो येरवडा कारागृहात होता. या तीन वर्षांच्या काळात नऊ महिने ससून रुग्णालयात विविध उपचाराच्या नावाखाली तो राहिला

ससून रुग्णालयातून काही दिवसांपूर्वी तो फरार झाला होता. पंधरा दिवस फरार राहिल्यानंतर मुंबई पोलिसांनी त्याला कर्नाटकातून अटक केली. या दरम्यान मुंबई पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली.

महत्त्वाच्या बातम्या- 

“उद्धव ठाकरेंना अडवताय, तुमची लायकी काय?”

पुन्हा जोरदार पाऊस कोसळणार; वाचा हवामान खात्याचा अंदाज

जरांगे मराठा मुलांच्या भल्यासाठी नाही, तर… काॅंग्रेसच्या ‘या’ बड्या नेत्याचा गंभीर आरोप 

शरद पवारांनी उपसलं हुमकी अस्त्र, अजित पवारांचं आता काय होणार?

भारत विरुद्ध नेदरलँड सामन्यासाठी मोठा बदल, ‘या’ मॅचविनर खेळाडूची संघात एन्ट्री!